साधारण (७-८ माणसांसाठी)
साहित्य :
२०० ग्रॅम रताळी
२०० ग्रॅम सुरण
२०० ग्रॅम कोन
१५० ग्रॅम वांगी
२०० ग्रॅम लहान बटाटे
१५० ग्रॅम प्रत्येकी तूर व वालपापडी
५ मोठी केळी,जास्त पिकलेली असू नयेत
२ मध्यम जुड्या मेथी
१ १/२ वाटी तेल
२ टेबल स्पून भरून ओवा
१ मोठा नारळ
१ मोठी कोथिंबीरीची जुडी
१ वाटी भरून आलं,लसूण,(लसूण पात मिळाली तर उत्तम )हिरव्या मिरच्या यांची पेस्ट
धणे पूड,जिरे पूड,मीठ
कृती:
मेथीची मुटकुळी :
मेथी बारीक चिरून घ्यावी, त्यात थोडे गहू पीठ,चणा व तांदूळ पीठ, आलं लसूण मिरची पेस्ट,धणा जिरा पावडर व मीठ घालून थोडे घट्टसर भिजवावे व त्याची मुटकुळी तेलात तळून घ्यावीत.
मसाला :
नारळ,कोथिंबीर,आलं लसूण मिरची पेस्ट,धणा जिरा पावडर व मीठ घालून हा मसाला तयार करावा.
सर्व भाज्या फार बारीक चिरू नयेत. प्रत्येक भाजी मसाला लावून वेगळी ठेवावी. ते अशासाठी कि ज्या भाज्याना शिजायला जास्त वेळ लागतो त्या फोडणीत आधी घालायच्या असतात म्हणून.
मेथीची मुटकुळी
मसाला
सुरण, रताळी, कोन
वांगी, बटाटा, तूर, वालपापडी
केळी
मोठ्या पातेल्यात तेल घालून गरम करावे, तेल चांगले गरम झाले कि त्यात ओवा टाकावा, मग सुरण,रताळी,कोन,बटाटा,तूर,वाल पापडी,वांगी अश्या भाज्या घालाव्यात.भाज्या शिजण्यासाठी थोडे पाणी घातले तरी चालेल.(खरं तर हा उंधियो खूप तेल घालून करायचा असतो पण हल्ली आपण तेलाचा वापर कमी करतो म्हणून पाणी घातले तरी चालते) ह्या भाज्या शिजत आल्या कि मग केळी व मेथीची मुटकुळी घालावीत, थोडा वेळ अजून भाज्या शिजून द्याव्यात.पूर्ण उंधियो व्हायला साधारण १ तास लागतो.
उंधियो शिजतांना
उंधियो शिजल्यावर
तयार उंधियो
वैशाली काजरेकर
मस्त, मस्त !!
उत्तर द्याहटवाक्रमाने फ़ोटो काढल्यामुळे व्यवस्थित कळतेय पाककॄती.
और भी आने दो :)
खरंय.. फोटो बाकी मस्तं काढलेयस.. नक्कीच उंधियो मस्तं होणार. करून बघते आणि नक्की कळवते... अजून पण शिकवा आम्हाला काही नवीन नवीन... :)
उत्तर द्याहटवाKeep it up ! When are you inviting me?
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाअहाहा..... क्या बात है !!!!! तोंडाला पाणी सुटलं...... पण अमेरीकेत राहणार्या Bachelor लोकांना असले फोटो बघायला लावणं हा अत्याचार आहे..... :)
उत्तर द्याहटवाफोर्स्ड बॅचलर्स चे जाऊ द्या पण नैसर्गिकरित्या बॅचलर असणाऱ्या लोकांची लवकरात लवकर विकेट उडण्यासाठीच उंधियो चा शोध लागला असणार
हटवा