सोमवार, १० जानेवारी, २०११

ब्लॅक फ़ॉरेस्ट केक



साहित्य
मिल्कमेड (Condensed Milk) – १ टीन
मैदा – २२५ ग्रॅम
अमूल बटर – १२५ ग्रॅम
कोको पावडर – ३-४ टेबल स्पून
पेप्सी किंवा कोक – १ बाटली (२०० मिली)
बेकींग पावडर – १ टी स्पून
सोडा बाय कार्ब – १ टी स्पून
फ्रेश किंवा Whipped Cream – आयसिंग करता
वॅनिला इसेंस – १ टीस्पून
चॉकलेट – १ स्लॅब, २५-४० ग्रॅम
मिक्स फ्रुट जॅम
7 Up किंवा Sprite – १ कॅन

कृती
१.      बेकिंग पॅनल तुपाचा हात लावून त्यावर ३-४ चिमूट मैदा टाकून हलक्या हाताने हलवा.  त्याने तो सारखा पसरेल आणि ट्रे ग्रीझ होईल.
२.     एका भांड्यात अमूल बटर मंद गॅसवर वितळवून घ्या. भांडं उतरवून ते थंड झालं की त्यात मिल्कमेड घाला. 
३.     दुसर्‍या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर, सोडा बाय कार्ब एकत्र चाळून घ्या. 
४.     वरील चाळलेलं साहित्य बटर आणि मिल्कमेडच्या मिश्रणात हळुहळु घालून आणि पेप्सी किंवा कोक गरजेप्रमाणे मिश्रण एकजीव करण्यासाठी घालून हॅंडमिक्सीने एकाच दिशेने भांड्यात खूप फिरवून घ्या.  केकचं मिश्रण तयार.  मिश्रण खूप जाड किंवा खूप पातळ करु नये.
५.     केकचं मिश्रण ग्रीझ केलेल्या बेकिंग पॅन मधे ओतून केक ३० मिनिटे १५० डिग्री सेल्शियस वर बेकिंग ओव्हन मधे बेक करणे.  केक झाला की नाही ते टूथपिक किंवा सुरी थोडी घालून बघणे.
६.      केक झाल्यावर भांडं बाहेर काढून ते थंड होऊ देणे.  थंड झाल्यावर दोन समान भागांमधे तो आडवा कापणे.  ह्याकरता सुरीने बाह्यरेषा आखून दोर्‍याने तो चांगला कापता येतो.  आखलेल्या बाह्यरेषेवर दोरा लावून दोन्ही हातात एकेक टोक धरुन कॉस मारला की केक कापल्या जाईल.


आईसिंग
१.      केकच्या खालच्या कापलेल्या भागावर चमच्याने थोडं थोडं 7 Up किंवा Sprite घालून ते soak करणे. 
२.     वरुन मिक्स फ्रुट जॅम लावणे.
३.     त्यावर वॅनीला इसेंस घालून beat केलेलं क्रीम घालणे.
४.     दुसरा केकचा थर वरती ठेवणे.
५.     दुसर्‍या थराच्या वरती पुन्हा थोडं थोडं 7 UP किंवा Sprite चमच्याने soak करुन त्यावर क्रीमचा थर लावणे. 
६.      चॉकलेट स्लॅब किसून अशा रितीने घालणे की क्रीम दिसणार नाही.
७.     कॅडबरी जेम्स, चेरीज, स्ट्रॉबेरीज वरती लावून केक डेकोरेट करणे.










मुग्धा सरनाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा