बुधवार, १२ जानेवारी, २०११

कोलंबीचे लोणचे




साहित्य:

१ चिमुट  हिंग
१ टी स्पून मोहरी
१  टेबल स्पून तेल
१ छोटा चमचा हळद
१ १/2 टी स्पून तिखट
चवीप्रमाणे मीठ
२ चमचा केप्र किवा बेडेकर चा लोणच्याचा मसाला
१ कप पाणी
चवीप्रमाणे लिंबाचा रस
अर्धा किलो कोलंबी (दोरे काढून)


कृती:

१. कोलंबीला मीठ, हळद, तिखट लावून ठेवा.
२. गॅसवर  एका भांड्यात तेल टाकून त्यात हिंग आणि मोहरी ची फोडणी करा.
३. त्यात कोलंबी आणि लोणच्याचा मसाला घालून  परतवा.
४. पाणी घालून ढवळा आणि भांड्यावर झाकण ठेवून शिजवा.
५, कोलंबी शिजली की गॅस बंद करून भांडं खाली उतरवा आणि थंड होऊ द्या.
६. थंड झाल्यावर लिंबाचा रस घाला.
७. पराठ्यासोबत एकदम झकास लागतं.














सौ. मुग्धा सरनाईक

1 टिप्पणी:

  1. मस्त एकदम......घरी करून बघायला हरकत नाही........अजून पाककृती टाकत रहा.........आमच्यासारख्यांना खूप उपयोग आहे याचा......

    उत्तर द्याहटवा