रविवार, ९ जानेवारी, २०११

महाराष्ट्र मंडळाचं अस्मिता गीत

हर दिलाची एक बोली
मी मराठी, मी मराठी
रुजवू मराठी, फुलवू मराठी
खुलवू मराठी, फुलवू मराठी

ह्या कुवेती वाळवंटी
रुजवू हिरवळ, ही मराठी
आसमंती गर्द काळ्या
चांदणे फुलवू मराठी

सोडुनी आलो जरी प्रिय
मातृभूमी आपुली
दूरदेशी तरीही आपण
जागवू अपुली मराठी

उच्च अपुल्या संस्कृतीचा
वारसा देऊ मुलांना
मिरवुया बाणा मराठी
घडवुया हे मन मराठी

नव-पिढीला आज आपण
देऊ पाऊल हे मराठी
नवगतीला यशपथावर
साथ देईल ही मराठी

घे भरारी उंच नभी तू
बघ नवी स्वप्ने परी
विसरु नको तू रक्त अपुले
हे मराठी, हे मराठी

लीन होऊन आज वंदू
मायभूमी आपुली
पांग फेडू याच जन्मी
जिंकवू अपुली मराठी













जयश्री अंबासकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा