चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०११

माझ्या चारोळ्या

क्रांती झाली ’फेस’ वर ’बुक’
काळे केले ’होस्नी’ ने मुख
स्वातंत्र्याची आता जनतेला ग्वाही
हो ’मुबारक’ लोकशाही

~~~~~~~~~~~~~~~~~~~

’माया’ व ’ती’ पुढे वर्दी झुकली
स्पर्शता चरणी, वहाण लाजली
’सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद पोलिसांचे
कर्तव्याचा पडतो विसर, तळवे चाटती पुढार्‍यांचे

~~~~~~~~~~~~~~~~~~

’कृष्ण’ शिष्टाईला शापच आहे
असफल होण्याचा
कधी हस्तिनापुरी
तर कधी न्यूयॉर्कनगरी













अर्चना देशमुख

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०११

चारोळी

वीरगती पावलेल्या जवानांच्या
टाळूवरचेही खातात हे लोणी
घोटाळाही करतात ’आदर्श’
आजचे भ्रष्ट राजकारणी











अर्चना देशमुख

रविवार, ६ फेब्रुवारी, २०११

चारोळी

दूरदर्शनचा छोटा पडदा
जेव्हापासून झाला आहे जवळ
’जवळचे’ जात आहेत दूर अन्‌
नात्यांमधली संपली आहे कळकळ












अर्चना देशमुख

माझ्या चारोळ्या

लवासा

’लवासा’ चा प्रवाद म्हणजे
आणिक एक घोटाळा होता
’हिंदुस्तानी’ जनतेने केलेला
निसर्गाचा घात होता.

महागाई

महागाईच्या भस्मासुराला
पेट्रोलनेही साथ केली
कढईतल्या पोह्यांबरोबर
कांद्याची साथ गेली.


मिलिंद जोगळेकर