माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींनो....
गरजेसाठी कधीच दोस्तीचे नाते जो़डू नकोस
वाटले तरी तितक्या सहजतेने हे तोडू नकोस
रक्ताचे नाते नसू दे, मातीमोल ते कधीच नसते
आपुलकीची मित्रता सदैव अनमोलच असते
जीवन वाटेवर नव-नवीन नाती जुळतीलच बघ
ओंजळीत प्रेमवर्षावाची फुले तर साठतीलच बघ
सामंजस्य असावे आपणांत, मित्र होऊ समाधानी
ओझ्याचे हे नाते नव्हे, खूणगांठ बांधू या रे मनी
देणे घेणे व्यवहार, मैत्रीत अपुल्या नसावेत रे
मदतीचे हे अपुले हात, सदैव तत्पर असावेत रे
बाकी नसे मागणे काही, चार शब्द विश्वासाचे
प्रेम असेच अनंत असावे, नसावे चार दिसांचे

दीपिका जोशी
Good well said.
उत्तर द्याहटवा