साहित्य :
५०० ग्रॅम आंबे हळद
१०० ग्रॅम साधी हळद
१०० ग्रॅम आलं
१२ लिंबं
१०० ग्रॅम कैरी लोणच्याचा मसाला
मीठ
५ टेबल स्पून तेलाची फोडणी (नेहमीचीच)
कृती :
दोन्ही हळदी व आलं बारीक चिरुन घ्याव्यात. त्याला सगळ्या लिंबाचा रस व मीठ लावून २ तास तसेच ठेवून द्यावे. दोन तासानी त्यात लोणच्याचा मसाला व थंड फोडणी घालून चांगले कालवून ठेवावे. हळदीचे लोणचे तयार. हे लोणचे वर्षभर सुध्दा चांगले राहते.
टीप : थंडीच्या सिझन मध्ये ही हळद मिळते.
(खास कुवेत वासियांसाठी) ही हळद अपल्या (Lulu Hypermarket) मिळू शकते.
वैशाली काजरेकर
Kadak.....Thoda ithe pan pathvun de
उत्तर द्याहटवाएकदम चविष्ट.... माझे आवडते... छान छान बरणीत ठेवून फोटो तर लईच भारी आलाय...
उत्तर द्याहटवाAta Next time pasun Indiatun anayla nako. Kuwaitmadhe kuthe milta readymade loncha te kalla:)
उत्तर द्याहटवा