कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, २ डिसेंबर, २०१२
रविवार, १३ मे, २०१२
आई
दिवसाची सुरवात होई तिच्या आवाजाने
मधुर स्वरांच्या भिजलेल्या प्रेमाने
कधी लटका राग, कधी विनवणी
धडपड मुलांच्या कल्याणाची
जवळ असता न कळे किंमत
एका आवाजासाठी किती धडपड?
आशीर्वाद सदा पाठीशी
आठवणींचे झुले झुलती
मग हुरहूर कशाची?
नात्याची किंमत शिकवलीस सदा
फुलताना हळुवार फुंकर घातलीस सदा
आठवांचा झरा वाही सदोदित
वाहणाऱ्या मनाला आवरलेस नेहमी
दिले जे तू भरभरून
घेण्याचा प्रयत्न केला
ओंजळीतून कधी कधी निसटून गेला
न खंत न दुखं
मिळालेल्या क्षणांना उपभोगण्याची आस.
मातृवंदना
निळ्या अंबराचे जसे निळ्या सागरी बिंब
आकांक्षांचे तुझ्या, माझ्या मनी प्रतिबिंब
वात्सल्यरसात तुझ्या जाहले मी चिंब
तूच केलास माझ्या मूळाक्षरांचा प्रारंभ
ज्ञानचक्षुंनी तुझ्या पाहिले मी जगाकडे
दूर केलेस मार्गातील संकटांचे काटे कुटे
आजारी मी पडता होई तुझी कासाविसी
मनाच्या वेदनांना देशी तव मायेची कुशी
प्रगतीपथावर मम पाऊल पडावे पुढे
सुसंस्कारांचे दिले सदैव मजला धडे
यशासाठी माझ्या घालिशी तू साकडे
जीवनी मम शिंपाया साफल्याचे सडे
आली शंका वा पडता काही कोडे
तुजपाशी येता रहस्य सारे उलगडे
मन आहे माझे अजुनी भाबडे वेडे
तव चरणांपाशी त्रिभुवनही वाटे थिटे
आई तुझ्या उपकारांचे कधी न ओझे फिटे
वाहीन मी बहु आनंदे त्या जन्मजन्मान्तरीते !!!
Mother’s Day अर्थात मातृदिनानिमित्त सर्व माऊलींना त्रिवार वंदन !
मंगळवार, १ मे, २०१२
महाराष्ट्र माझा' काही (-) काही (+)
वेगवेगळे भूखंड केले मंत्र्यांनी फस्त
कॅग अहवालाने झाले आता सर्व त्रस्त
करावे वाटते आता कॅग च बरखास्त
तरीही महाराष्ट्र आहे माझा मस्त !
IPL च्या मॅचेसमुळे चिअर्स चा वाढता गोंगाट
स्टेडीयममध्ये रात्रंदिवस विजेचा लखलखाट
ग्रामीण भागात सक्तीच्या लोडशेडींगमुळे
जनतेच्या लल्लाटी मात्र सदैव अंधारवाट
वैद्यकीय अभियांत्रिकी प्रवेशाचे
निकष बदलत रहातात वेळोवेळी
अतिरिक्त ताण नि अभ्यासाची
शिक्षा मात्र विद्यार्थ्यांच्या भाळी
कसाब भोवती जेलमध्ये जरी भारी गस्त
बिर्याणीची , मटणाची ताटे होती फस्त
इकडे अवर्षणग्रस्त उपासमारीने त्रस्त
तरीही महाराष्ट्र आहे माझा मस्त !
सरतेशेवटी नाही घेतली
पुणेकर होण्याची मुभा
थोडी तरी राखली प्रतिभांनी
राष्ट्रपती पदाची आभा
अमेरिकेत झळकते आमचे IT चे ज्ञान
वैद्यक क्षेत्र असो की क्रिकेटचे मैदान
मराठी माणसाची रोजच वाढते आहे शान
असा आहे माझा महाराष्ट्र महान
शाळा, बालगंधर्व तसेच ताऱ्यांचे बेट
देऊळला लाभली रा.पुरस्काराची भेट
सृजनशील कलावंतांचे सुफळ होती कष्ट
असे आहे माझे महान राष्ट्र उत्कृष्ट
चित्रपट तारे तारकांनाही पडते ज्याची भुरळ
उज्वल भविष्यासाठी ज्याला सारे करती जवळ
बुद्धिवंतांना लाभे जेथे शारदेचा वरदहस्त
असा आहे लोकहो, महाराष्ट्र माझा मस्त
कितीही सर्वांनी केली दरखास्त.............. (अर्ज,फिर्याद)
मराठीचा, म.दिनाचा होऊ दे अस्त
कोणालाही नसली याची वास्तपुस्त
तरीही म्हणेन मी महाराष्ट्र माझा मस्त
महाराष्ट्र माझा खूप खूप मस्त !!!!!!!!!
जय महाराष्ट्र ! जय जय महाराष्ट्र
कॅग अहवालाने झाले आता सर्व त्रस्त
करावे वाटते आता कॅग च बरखास्त
तरीही महाराष्ट्र आहे माझा मस्त !
IPL च्या मॅचेसमुळे चिअर्स चा वाढता गोंगाट
स्टेडीयममध्ये रात्रंदिवस विजेचा लखलखाट
ग्रामीण भागात सक्तीच्या लोडशेडींगमुळे
जनतेच्या लल्लाटी मात्र सदैव अंधारवाट
वैद्यकीय अभियांत्रिकी प्रवेशाचे
निकष बदलत रहातात वेळोवेळी
अतिरिक्त ताण नि अभ्यासाची
शिक्षा मात्र विद्यार्थ्यांच्या भाळी
कसाब भोवती जेलमध्ये जरी भारी गस्त
बिर्याणीची , मटणाची ताटे होती फस्त
इकडे अवर्षणग्रस्त उपासमारीने त्रस्त
तरीही महाराष्ट्र आहे माझा मस्त !
सरतेशेवटी नाही घेतली
पुणेकर होण्याची मुभा
थोडी तरी राखली प्रतिभांनी
राष्ट्रपती पदाची आभा
अमेरिकेत झळकते आमचे IT चे ज्ञान
वैद्यक क्षेत्र असो की क्रिकेटचे मैदान
मराठी माणसाची रोजच वाढते आहे शान
असा आहे माझा महाराष्ट्र महान
शाळा, बालगंधर्व तसेच ताऱ्यांचे बेट
देऊळला लाभली रा.पुरस्काराची भेट
सृजनशील कलावंतांचे सुफळ होती कष्ट
असे आहे माझे महान राष्ट्र उत्कृष्ट
चित्रपट तारे तारकांनाही पडते ज्याची भुरळ
उज्वल भविष्यासाठी ज्याला सारे करती जवळ
बुद्धिवंतांना लाभे जेथे शारदेचा वरदहस्त
असा आहे लोकहो, महाराष्ट्र माझा मस्त
कितीही सर्वांनी केली दरखास्त.............. (अर्ज,फिर्याद)
मराठीचा, म.दिनाचा होऊ दे अस्त
कोणालाही नसली याची वास्तपुस्त
तरीही म्हणेन मी महाराष्ट्र माझा मस्त
महाराष्ट्र माझा खूप खूप मस्त !!!!!!!!!
जय महाराष्ट्र ! जय जय महाराष्ट्र
| अर्चना देशमुख |
गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११
गार्हाणे
Lift मधून बाहेर येताच
आला खरपूस खमंग वास
स्वप्नात आहे मी की
हा जागेपणीचा भास ?
बेल वाजवली उघडे दार
कळले हा नव्हता परीहास
परीटघडीच्या कपड्यात भार्या
सुसज्ज होती स्वागतास
सुहास्यवदने वदली नाथा
आज कामाचा झाला का फार त्रास
असल्या सुखस्वप्नांचे मोहक चित्र
केव्हाच तर गेले होते लयास
गेल्या कित्येक दिवसात, वर्षात
माझी मुळी ठेवली नव्हती पत्रास
वाटले परतून आला खचितच
विवाहानंतरचा तो धुंद मधुमास
ज्ञात झाले मंडळाने महिलांसाठी
स्पर्धा योजिली आहे खास
"मी सुगरण’ बनण्याचा
भार्येने घेतला आहे ध्यास
रोज नव्या डिशेसची टेबलावर
रचू लागली भली मोठी रास
शेजारी, पाजारी, मित्र मंडळी
सार्यांचेच भाग्य आले उदयास
बच्चे कंपनीचा आनंदही अगदी
पोचला जाऊन थेट गगनास
कारण रसनेसोबतच सजावटीची
व्हायची रोज नवनवी आरास
पण हाय..... दिवस उगवला "Family Day" चा
बक्षिसाची मावळली आशा अन् भोपळा फुटला भ्रमाचा
भार्येच्या दिवास्वप्नांचा पुरता झाला र्हास
चूल झाली बंद आता रोज आम्हाला उपवास
आता रोजच आम्हाला उपवास
अर्चना देशमुख
आला खरपूस खमंग वास
स्वप्नात आहे मी की
हा जागेपणीचा भास ?
बेल वाजवली उघडे दार
कळले हा नव्हता परीहास
परीटघडीच्या कपड्यात भार्या
सुसज्ज होती स्वागतास
सुहास्यवदने वदली नाथा
आज कामाचा झाला का फार त्रास
असल्या सुखस्वप्नांचे मोहक चित्र
केव्हाच तर गेले होते लयास
गेल्या कित्येक दिवसात, वर्षात
माझी मुळी ठेवली नव्हती पत्रास
वाटले परतून आला खचितच
विवाहानंतरचा तो धुंद मधुमास
ज्ञात झाले मंडळाने महिलांसाठी
स्पर्धा योजिली आहे खास
"मी सुगरण’ बनण्याचा
भार्येने घेतला आहे ध्यास
रोज नव्या डिशेसची टेबलावर
रचू लागली भली मोठी रास
शेजारी, पाजारी, मित्र मंडळी
सार्यांचेच भाग्य आले उदयास
बच्चे कंपनीचा आनंदही अगदी
पोचला जाऊन थेट गगनास
कारण रसनेसोबतच सजावटीची
व्हायची रोज नवनवी आरास
पण हाय..... दिवस उगवला "Family Day" चा
बक्षिसाची मावळली आशा अन् भोपळा फुटला भ्रमाचा
भार्येच्या दिवास्वप्नांचा पुरता झाला र्हास
चूल झाली बंद आता रोज आम्हाला उपवास
आता रोजच आम्हाला उपवास
अर्चना देशमुख
सोमवार, १९ सप्टेंबर, २०११
पावसाच्या देवा.....
पावसाळा आला, पाऊस मात्र नाही
आभाळ भरुन आलं, पण कोसळलंच नाही
पावसाचा देव म्हणे रुसला होता
माझं गाव सोडून, बाकी बरसला होता
वेशीपल्याड सारं काही भिजवत होता
मला मात्र मुद्दाम विसरत होता
देवाकडे जेव्हा मी गा-हाणं केलं
तेव्हा त्याने त्याचं भांडार…. खुलं केलं
खेळी मात्र पावसाने अशी काही केली
आई माझी आभाळात उचलून नेली
केलं पार पोरकं त्याने भर पावसात
विश्व केलं उध्वस्त, फक्त काही क्षणात
बांध फुटला डोळ्यांचा, आवरेना पाऊस
तेव्हा मात्र सोबत माझ्या, रडला पाऊस
आता फक्त पावसाळा, दुसरा ऋतू नाही
भिजलं अंग पुसायला, आई मात्र नाही
पावसाच्या देवा पुन्हा असं नको करुस
बदल्यात पावसाच्या कुणाची, आई नको नेऊस
आज आईला जाऊन एक महिना झाला........ !! जेव्हा हे जाणवतं की आता आई फक्त आठवणीतच राहणार त्यावेळी मात्र जीव कासावीस होतो....काही काही सुचेनासं होतं. सगळी सुखं असूनही फार एकटं आणि भकास वाटतं. तिचा कौतुकाने पाठीवर फिरणारा हात, काळजीने डोक्यावरुन फिरलेला हात....सगळं सगळं अगदी तसंच जाणवतं... अंग शहारतं. मग तिच्या आजारपणात तिच्या डोक्यावरुन हात फिरवतांना झालेला तिच्या रुपेरी केसांचा उबदार स्पर्श आठवतो..... सरणावर जातांना तोच स्पर्श किती थंड असतो ..... !!
आई.................
.....
यापेक्षाही जास्त दु:ख असू शकतं ???
जयश्री अंबासकर
यापेक्षाही जास्त दु:ख असू शकतं ???
जयश्री अंबासकर
बुधवार, ७ सप्टेंबर, २०११
धावून ये गणेशा
ही मी लिहिलेली गणपतीची आळवणी नागपूरच्या सुबोध साठे याने संगीतबद्ध करुन गायली आहे.
काळोख पातकांचा, दाही दिशांत झाला
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा
स्वार्थात अंध झाले, सारेच मत्त झाले
वाली कुणी न आता, सारेच माजलेले
उन्माद आवराया, देवा तुझी प्रतिक्षा
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा
जगतावरी फिरुनी, साम्राज्य दानवांचे
धरबंद राहिले ना, कोणासही कशाचे
बेबंद दानवांचा, नि:पात तू करावा
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा
तू पाप, ताप, दु:खा, हरिले सदैव देवा
भक्तांस तारिले तू, अन् रक्षिलेस देवा
विश्वास आमुचा हा, तोडू नकोस देवा
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा
हे गाणं तुम्ही इथे ऐकू शकता.
धावून ये गणेशा
जयश्री अंबासकर
मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११
गणपती गान
गुणाचे गान
स्वरुपाचे ज्ञान
ओमकाराची तान
गणपती गुणगान
तुझ्या मुखी एकदंत
भालचंद्र विशाल
नेत्री जागती अपार
ज्योती कोटी रात्रंदिन
भावाचा तू भुकेला
दीनांचा तू तारक
सर्वांना बघसी एक
देसी समसमान दान
तुझ्या पायी नतमस्तक मी
झालो तुझा मी रे दास
सगुण निर्गुण दयाळा तू
तारीसी सदा भक्तास
तुझे रुप, तुझी शक्ती
भक्ती करीतो रात्रंदिन
देवांचाही देव तू सकळ
त्राही माम् भगवान
भावना कुलकर्णी
सोमवार, ५ सप्टेंबर, २०११
भष्टाचार लढा
स्वातंत्र्य मिळाले येण्या सुबत्ता, नांदते म्हणे आता येथे लोकशाही
अर्चना देशमुख
शोषितांच्या विटंबना नी शेतकर्यांचे गळफास पाहतो आपण याची डोळा याची देही
"गरीबी हटाओ" चे नारे देत नेत्यांनी भरले आपलेच खिसे
भुकेकंगालांची पोटे खपाटीला, कारण घरांचे पोकळ वासे
भ्रष्ट विचार, भ्रष्ट आचार, सुखविलासांनी नेते धष्टपुष्ट
महागाईमुळे त्रस्त जनतेचे दिवसेंदिवस वाढताहेत कष्ट
झाडाचे जसे पानही हलत नाही वार्याच्या झोताशिवाय
कितीही रान उठवले तरी होतंच नाही काम पैसे ओतल्याशिवाय
भ्रष्टाचाराविरुध्द आता अण्णान्नी पुकारले आहे रणशिंग
प्रशांत भूषण, केजरीवाल, किरण बेदी या सहकार्यां संग
मनी आहे आस फक्त जनकल्याणाची, लोकांच्या सुखक्षेमाची
होवो कितीही त्रास आता, नाही पर्वा स्वत:च्या देहभानाची
युध्द आहे पण तरीही हाती धरणार नाही कोणतेही शस्त्र
सत्य, निष्ठा, शांतीसोबत उपोषणाचे अवलंबले अस्त्र
सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो आहे, मराठी माणसाची वाढवली आहे शान
जनमताच्या रेट्यापुढे सरकारलाही तुकवावी लागेल मान
अण्णांच्या उपोषणाने रामलीला मैदानही झाले आहे अति दग्ध
लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी सुजाण जन आहेत कटीबध्द
"यतो धर्मस्ततो जय:" असे भगवंतांनी दिले आहे प्रमाण
त्याच्या सत्यतेसाठी सामान्य जनांचे गोळा झालेत पंचप्राण
संपेल उपोषण, झुकेल सरकार, पण होईल का भारत भ्रष्टाचारमुक्त
तेजस्वी भारताच्या नवनिर्मितीसाठी होईल का सारी जनता उद्युक्त ?
मंगळवार, २९ मार्च, २०११
प्रलय
प्रलय आला, प्रलय आला
सागराचा कोप झाला
अक्राळ-विक्राळ लाटांनी ह्या
धरतीचा तुकडा गिळला
गाई-गुरे अन् प्राणी, पक्षी
माणसेही नाही निराळी
कोसळला इमला सारा
धरतीचा अन् भार वाढला
दर्याच्या ह्या लाटांनी
क्षणार्धात की हलका केला
ओसरता हे खारे पाणी
भग्न चित्र ते उभे राहिले
तुटकी दारे, पडके वाडे
रिती मने अन् विझले डोळे
संपले का हो सगळे आता
आटली इथली जीवनसरिता
दगडविटांच्या राशीखाली
श्वास कोंडला जीव निमाला
काय अचानक हे दिसले
राखेमधुनी कोंब फुटे
विझलेल्या या राखेखाली
शांत चिमुकला जीव दिसे
नसे दु:ख त्या, नसे निराशा
नसे कालचे रडगाणे
नव्या जगाचा पाईक म्हणुनी
उठेल ह्या राखेमधुनी
उठेल ह्या राखेमधुनी
नीलिमा दिवेकर
सागराचा कोप झाला
अक्राळ-विक्राळ लाटांनी ह्या
धरतीचा तुकडा गिळला
गाई-गुरे अन् प्राणी, पक्षी
माणसेही नाही निराळी
कोसळला इमला सारा
धरतीचा अन् भार वाढला
दर्याच्या ह्या लाटांनी
क्षणार्धात की हलका केला
ओसरता हे खारे पाणी
भग्न चित्र ते उभे राहिले
तुटकी दारे, पडके वाडे
रिती मने अन् विझले डोळे
संपले का हो सगळे आता
आटली इथली जीवनसरिता
दगडविटांच्या राशीखाली
श्वास कोंडला जीव निमाला
काय अचानक हे दिसले
राखेमधुनी कोंब फुटे
विझलेल्या या राखेखाली
शांत चिमुकला जीव दिसे
नसे दु:ख त्या, नसे निराशा
नसे कालचे रडगाणे
नव्या जगाचा पाईक म्हणुनी
उठेल ह्या राखेमधुनी
उठेल ह्या राखेमधुनी
नीलिमा दिवेकर
रविवार, २७ मार्च, २०११
त्सुनामी वाळूची
अकस्मात आकाशी धुराचे लोळ
सार्यांच्या मनी उठला हल्लकल्लोळ
रिफायनरीतल्या आगीचे का असतील लोळ
का कुठे स्फोटाने झाली असेल जाळपोळ
मिट्ट झाला काळोख चोहीकडे
बंद घरातही जीव घुसमटे
भरीला सोसाट्याने वाहू लागला वारा
चढू लागला सार्यांच्या अस्वस्थतेचा पारा
काहींना वाटले, ही शेवटची घंटा
यमराजाचं फर्मान, ’मला येऊन भेटा’
मायदेशी केले दूरध्वनीवर संभाषण
अखेरच्या निरोपाचा येऊन ठेपला क्षण
कुवेतमधले नेटवर्क होऊन गेले जाम
जीवलगांचा आता कसा शोधावा माग
काळजीने जीवाने सोडला अगदी थांग
ठप्प झाली रस्त्यात गाड्यांची रांग
शेजारी पाजारी केला विचारविमर्ष
वाळूच्या वादळाचाच निघाला निष्कर्ष
’२०१२’ तल्या दृष्यांचे आभास झाले सदृष्य
जीवलग परतून येता मनी दाटला हर्ष
नेटवर कळले ही तर वाळूची त्सुनामी
मिळू लागली पुन्हा आयुष्याची हमी
चित्रगुप्ताचे अद्याप चालू आहे अधिक उणे
उर्वरीत आयुष्याचे सार्यांनी करावे सोने
अर्चना देशमुख
सार्यांच्या मनी उठला हल्लकल्लोळ
रिफायनरीतल्या आगीचे का असतील लोळ
का कुठे स्फोटाने झाली असेल जाळपोळ
मिट्ट झाला काळोख चोहीकडे
बंद घरातही जीव घुसमटे
भरीला सोसाट्याने वाहू लागला वारा
चढू लागला सार्यांच्या अस्वस्थतेचा पारा
काहींना वाटले, ही शेवटची घंटा
यमराजाचं फर्मान, ’मला येऊन भेटा’
मायदेशी केले दूरध्वनीवर संभाषण
अखेरच्या निरोपाचा येऊन ठेपला क्षण
कुवेतमधले नेटवर्क होऊन गेले जाम
जीवलगांचा आता कसा शोधावा माग
काळजीने जीवाने सोडला अगदी थांग
ठप्प झाली रस्त्यात गाड्यांची रांग
शेजारी पाजारी केला विचारविमर्ष
वाळूच्या वादळाचाच निघाला निष्कर्ष
’२०१२’ तल्या दृष्यांचे आभास झाले सदृष्य
जीवलग परतून येता मनी दाटला हर्ष
नेटवर कळले ही तर वाळूची त्सुनामी
मिळू लागली पुन्हा आयुष्याची हमी
चित्रगुप्ताचे अद्याप चालू आहे अधिक उणे
उर्वरीत आयुष्याचे सार्यांनी करावे सोने
अर्चना देशमुख
मंगळवार, ८ मार्च, २०११
भारतीय नारी...छवि तुझी न्यारी
गार्गी आणि मैत्रेयीची ख्यातनाम आहे ज्ञानलालसा
खंडित झाला तरीही, नव्याने रुजवला आहे हा वारसा
अहिल्या, दौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा
प्रात:स्मरणी मिळवून स्थान, देती पातिव्रत्याची संथा
सन्माननीय मातृत्वाने धन्य झाली कूस जिजाईची
संस्कारांमुळेच तिच्या, शक्य झाली स्थापना हिंदवी स्वराज्याची
“माझी झाशी देणार नाही” हा बाणा जपणारी झाशीची राणी
अतुल्य धाडस, लढाऊ वृत्तीने अजरामर हिची कहाणी
परकी भूमी, परके आचारविचार, परक्या भाषा, संस्कृतीशी
जुळवून झाली यशस्वी, पहिली भारतीय नारी डॉ.आनंदी जोशी
बालवयीही बाहुलीऐवजी देशप्रेमाने भारलेली इंदिरा
कठीण बनून वज्रासारखी रक्षिली तिने धरा
सूरस्वामिनी, स्वरमोहिनी, गानकोकिला लता मंगेशकर
मांडवापासून सरणापर्यंत सोबत निनादतो हिचाच स्वर
मॅगसेसे एवॉर्ड, एशियन नोबेल पीस ऍवार्ड विजेती डॉ.किरण बेदी
बदलून चेहरा तिहार जेलचा, दाखवले आदिमायेचे रुप पोलादी
आकांक्षा पुढती गगन ठेंगणे, ही उक्ती सार्थ करणारी कल्पना चावला
अद्भुतरम्य साहस हिचे, घातली गवसणी अवकाशाला
जगभरातील प्रभावशाली व्यक्तीमत्वात सामिल झाली इंद्रा नुयी
C.E.O पेप्सीकोची, भारतीयांसाठी ठरली किती गौरवदायी
अर्थशास्त्र, बँकींग सारख्या जटील विश्वातही स्त्रियांनी मारली आहे बाजी
M.D. आणि C.E.O झाली आहे चंदा कोचर I.C.I.C.I. बँकेची
विविध क्षेत्रातील भारतीय स्त्रियांचे हे उल्लेखनीय योगदान बघितल्यावर पूर्वीचे स्त्री चे वर्णन करणारे शब्द,
“स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमॄत, नयनी पाणी”
या ऐवजी
“स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, लाथ मारेल तेथे काढेल पाणी”
असेच करायला हवे.
या सार्या स्त्रियांना मन:पूर्वक अभिवादन !!
खरंच, मला अभिमान आहे, मी भारतीय नारी असल्याचा !
“कैफियत” कुवेतमधील समस्त पुरुषवर्गाची
(निमित्त महिलादिनाचे)
चाकरमानी सारे आम्ही
उठावंच लागतं आम्हाला
अगदी भल्याऽऽऽ पहाटे
न फोडता कोणतेही फाटे
नवनव्या स्वप्नात मग्न असते
सौभाग्यवतीची रम्य पहाट
चहाचं आधण गॅसवर चढवत
हलकेच घालतो तिला मी साद
उशीरच झाला अंमळ थोडा
टिफीनचा कसा आता साधावा मेळ
कॅंटिनवरच भागवाल का आज
कशीबशी मारुन न्या ही वेळ
कामाच्या कटकटींनी दिवसभर
डोकं जातं अगदी उठून
किटी पार्टीचा कैफ “सौ” चा
उतरलेला नसतो अजून
चक्रधारी बनून जावेच लागते
गिफ्ट आणायला, ट्युशनला सोडायला
वेळच नाही मिळत कधी
शांत, निवांत टिव्ही पहायला
महिलावर्गासाठी येथे
रोजच दसरा नि दिवाळी
संसाराच्या ओझ्याची
शिक्षा मात्र आमच्याच भाळी
पिकनिक, आऊटींग नसले तरीही
विकेंडला लटकते “किचन बंद” ची पाटी
पेंडींग कामांची सोपवली जाते
हाती आमच्या भली मोठी यादी
वाढदिवस कधी सौ चा, तर कधी लग्नाचा
पार्टीसाठी कधी हिल्टन, तर कधी रॅडीसन सास
पुरणपोळीच्या खमंग वासाचा मात्र
अपुराच राहतो घेतलेला ध्यास
2 “B” (बॉस आणि बायको) चा
कायम ओढवून घेतो रोष
कसाला यांच्या उतरतांना
कंठाला पडतो शोष
गरजच काय कुवेतमधे
साजरा करण्याची महिला “दिन”
हवालदिल पुरुष बिचारे
झाले आहे दुर्बल “दीन”
अर्चना देशमुख
सोमवार, ७ मार्च, २०११
स्त्री ची रुपं
स्त्री तुझी रूपं गं किती ,
जन्म देणारी आई, बोट धरून रस्ता दाखवणारी माऊली,
कधी होतेस तू कडेवर घेवून गल्लीत फिरणारी, लाड करणारी, खेळवणारी बहीण ती ताई,
कधी असतेस तू हक्काने भाऊ बीज मागणारी चिमी, छोटी सई,
कधी असतेस तू तारुण्याच्या सळसळत्या रक्ताला आवर आणि उचित वावर देणारी मैत्रीण,
हातात हात देत वाटेवर सदैव सोबत असणारी सखी,
रुसव्या फुगव्याचा श्रावण देत स्वप्नांना पंख देणारी पत्नी
पतीच्या स्वप्नांसाठी सर्वस्व अर्पण करणारी ती स्वामिनी
सुख दुखात साथ देणारी ती सहचारी
तुझे बीज अंकुरणारी, तुझ्या सारखेच रुपडे, तुझे बालपण अनुभवायला
देणारी तुझ्या छ्कुल्यांची आई
अन्यायावर सळसळून उठणारी ती अंबिका, ती असुर मर्दिनी
आयुष्याच्या संध्या छायेत तुझी सुश्रुषा करणारी तुझी अर्धांगिनी ,
ती तुझी सौभाग्याकांक्षिणी
स्त्री तुझी रूपं गं किती, रूपं गं किती !
स्वाती राजीव कुलकर्णी
बुधवार, २ मार्च, २०११
राहूनच गेलं
मी नेहमीप्रमाणे कामावर निघालो असता
तू तुझ्या दुडक्या पावलांनी धावत आलास
माझ्या पायाला तुझ्या इवल्याशा हातांनी
घट्ट मिठी मारलीस अन म्हणालास
"बाबा, आज संध्याकाळी मला कारमधून फिरायला नेशील?”
मी 'हो' म्हणताच तुझ्या डोळ्यात उठलेल्या आनंदतरंगात
माझं मन नखशिखांत भिजलं, पुरतं न्हाऊन निघालं
सोनुल्या, तुला मात्र त्या दिवशी फिरायला न्यायचं राहूनच गेलं!
त्या दिवशी घड्याळालाही जणू पाय फुटले होते
वेळेची गती बघून त्याचे ते काटे ही सटपटले होते
कामाच्या वेगाने तेव्हा मलाही झपाटले होते
तुझे नयन मात्र माझी वाट बघून बघून ताठले होते
तू खूप वाट बघितलीस, मग चिडलास
चिडून चिडून रडलास, रडून रडून दमलास
दमूनच तसाच मग मुटकुळं करून झोपी गेलास
तुझ्या झोपेतील स्वप्नं मात्र माझ्या
कारच्या बंद खिडकीत डोकावून गेलं,
सोनुल्या, तुला मात्र त्या दिवशी फिरायला न्यायचं राहूनच गेलं!
तू नंतर मोठा झालास, शाळेत ही जाऊ लागलास
शाळेतील गमतीजमती येऊन आईला सांगू लागलास
मी ऐकायला कधीच नव्हतो, होतो तेव्हां तू सांगितलं नाहीस
ना खेळून आल्यावर कधी तू घाम टिपलास माझ्या बाहीस
त्यानंतर कितीदातरी आपण कारमधून फिरायला गेलो
किती मजा करायला गेलो, डोंगरदर्या पहायला गेलो,
तुझ्या लक्षात आहे की नाही हे मला माहित नाही,
पण दरवेळी माझ्या मनात मात्र तो दिवस डोकावून गेला
सोनुल्या, तुला मात्र त्या दिवशी फिरायला न्यायचं राहूनच गेलं!
आता तर तुझे विश्व निराळे, तू त्यात हरवून जातोस
नवे मित्र, नवे छंद, नवी गीते, नवे तराणे गातोस
पण अजूनही जेव्हां अधूनमधून थोडासा भांबावून जातोस
तेव्हां आईच्या कुशीत शिरूनच तर तू आपले गार्हाणे गातोस
तुला जवळ घेण्यासाठी माझीही मिठी आसुसलेली असते
तू येत नाहीस हे पाहून माझी कार मात्र हळूच हसते
तुझ्या माझ्यातील पूल सांधता कळते त्याखालून तर
सारं आयुष्य वाहून गेलं
सोनुल्या, तुला मात्र त्या दिवशी फिरायला न्यायचं राहूनच गेलं!
डॉ.निरंजन जोशी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)










