साहित्य -
सादिया ड्रमस्टिक साधारण १.५ किलो
मेहरान तंदुरी मसाला १ पाकीट
१/२ वाटी तेल
१ छोटे पाकीट लबने (१००-१५० ग्रॅम)
कडीपत्ता २-४ पाने
कोथिंबीर १-२ चमचे
कृती -
रुम तापमानावर आल्यावर ड्रमस्टिक स्कीन काढून व स्वच्छ धुऊन, त्यावर हलकेच काप करून थोडा वेळ बाजूला ठेवून द्या. साधारण १० मिनिटांनंतर त्यातील पाणी निघून गेल्यावर २ चमचे लिंबाच्या रसात १ चमचा हळद घालून तो सर्व ड्रमस्टिकला लावा. परत १० मिनिटे बाजूला ठेवा.
एका भांड्यात १ पाकीट मेहरान तंदुरी मसाला, १/२ वाटी तेल, १ छोटे पाकीट लबने (१००-१५० ग्रॅम), कडीपत्ता २-४ पाने (बारीक चिरलेले), कोथिंबीर १-२ चमचे (बारीक चिरलेले) याचे एकजीव मिश्रण करून ते ड्रमस्टिक ना व्यवस्थित लावा व नंतर फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी कमीत कमी ६० मिनिटे ठेवा.
Barbecue ग्रील वर प्रत्येक ड्रमस्टिक हलकेच ठेवा व करपू न देता शिजवा. साधारण ६ मिनिटात ड्रमस्टिक तयार होते. गोल चिरलेला कांदा, टोमॅटो बरोबर खा.
भई वा...... !!
उत्तर द्याहटवा"कुठे कराल" च्या ऐवजी "कुठे खाल " असं विचारायला हवंस म्हणजे भूपेशकडे असं उत्तर देता आलं असतं :)
बाकी रेसिपी मस्तच !!
Sahi. Kuthchya beachvar yaycha Khayla:)
उत्तर द्याहटवाकधीचे ठरले ते कळवा आम्हाला. भूपेश असं करू.. मीच ठरवते कुठे जायचे ते आणि बाकी करणार तू.. ठीक?
उत्तर द्याहटवा