ही मी लिहिलेली गणपतीची आळवणी नागपूरच्या सुबोध साठे याने संगीतबद्ध करुन गायली आहे.
काळोख पातकांचा, दाही दिशांत झाला
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा
स्वार्थात अंध झाले, सारेच मत्त झाले
वाली कुणी न आता, सारेच माजलेले
उन्माद आवराया, देवा तुझी प्रतिक्षा
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा
जगतावरी फिरुनी, साम्राज्य दानवांचे
धरबंद राहिले ना, कोणासही कशाचे
बेबंद दानवांचा, नि:पात तू करावा
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा
तू पाप, ताप, दु:खा, हरिले सदैव देवा
भक्तांस तारिले तू, अन् रक्षिलेस देवा
विश्वास आमुचा हा, तोडू नकोस देवा
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा
हे गाणं तुम्ही इथे ऐकू शकता.
धावून ये गणेशा
जयश्री अंबासकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा