रविवार, १३ मे, २०१२

मातृवंदना



निळ्या अंबराचे जसे निळ्या सागरी बिंब
आकांक्षांचे तुझ्या, माझ्या मनी प्रतिबिंब
वात्सल्यरसात तुझ्या जाहले मी चिंब
तूच केलास माझ्या मूळाक्षरांचा प्रारंभ

ज्ञानचक्षुंनी तुझ्या पाहिले मी जगाकडे
दूर केलेस मार्गातील संकटांचे काटे कुटे
आजारी मी पडता होई तुझी कासाविसी
मनाच्या वेदनांना देशी तव मायेची कुशी

प्रगतीपथावर मम पाऊल पडावे पुढे
सुसंस्कारांचे दिले सदैव मजला धडे
यशासाठी माझ्या घालिशी तू साकडे
जीवनी मम शिंपाया साफल्याचे सडे

आली शंका वा पडता काही कोडे
तुजपाशी येता रहस्य सारे उलगडे
मन आहे माझे अजुनी भाबडे वेडे
 तव चरणांपाशी त्रिभुवनही वाटे थिटे

आई तुझ्या उपकारांचे कधी न ओझे फिटे 
वाहीन मी बहु आनंदे त्या जन्मजन्मान्तरीते !!!

Mother’s Day अर्थात मातृदिनानिमित्त सर्व माऊलींना त्रिवार वंदन !

-अर्चना देशमुख

1 टिप्पणी:

  1. भावना कुलकर्णी१४ मे, २०१२ रोजी १०:११ AM

    कविता मस्तच झाली आहे .
    तुमचे लेखन वाचण्यास मजा येते

    उत्तर द्याहटवा