मंगळवार, १ मे, २०१२

महाराष्ट्र माझा' काही (-) काही (+)

वेगवेगळे भूखंड केले मंत्र्यांनी फस्त

कॅग अहवालाने झाले आता सर्व त्रस्त

करावे वाटते आता कॅग च बरखास्त

तरीही महाराष्ट्र आहे माझा मस्त !


IPL च्या मॅचेसमुळे चिअर्स चा वाढता गोंगाट

स्टेडीयममध्ये रात्रंदिवस विजेचा लखलखाट

ग्रामीण भागात सक्तीच्या लोडशेडींगमुळे

जनतेच्या लल्लाटी मात्र सदैव अंधारवाट


वैद्यकीय अभियांत्रिकी प्रवेशाचे

निकष बदलत रहातात वेळोवेळी

अतिरिक्त ताण नि अभ्यासाची

शिक्षा मात्र विद्यार्थ्यांच्या भाळी


कसाब भोवती जेलमध्ये जरी भारी गस्त

बिर्याणीची , मटणाची ताटे होती फस्त

इकडे अवर्षणग्रस्त उपासमारीने त्रस्त

तरीही महाराष्ट्र आहे माझा मस्त !


सरतेशेवटी नाही घेतली

पुणेकर होण्याची मुभा

थोडी तरी राखली प्रतिभांनी

राष्ट्रपती पदाची आभा


अमेरिकेत झळकते आमचे IT चे ज्ञान

वैद्यक क्षेत्र असो की क्रिकेटचे मैदान

मराठी माणसाची रोजच वाढते आहे शान

असा आहे माझा महाराष्ट्र महान


शाळा, बालगंधर्व तसेच ताऱ्यांचे बेट

देऊळला लाभली रा.पुरस्काराची भेट

सृजनशील कलावंतांचे सुफळ होती कष्ट

असे आहे माझे महान राष्ट्र उत्कृष्ट


चित्रपट तारे तारकांनाही पडते ज्याची भुरळ

उज्वल भविष्यासाठी ज्याला सारे करती जवळ

बुद्धिवंतांना लाभे जेथे शारदेचा वरदहस्त

असा आहे लोकहो, महाराष्ट्र माझा मस्त


कितीही सर्वांनी केली दरखास्त.............. (अर्ज,फिर्याद)

मराठीचा, म.दिनाचा होऊ दे अस्त

कोणालाही नसली याची वास्तपुस्त

तरीही म्हणेन मी महाराष्ट्र माझा मस्त


महाराष्ट्र माझा खूप खूप मस्त !!!!!!!!!

जय महाराष्ट्र ! जय जय महाराष्ट्र


अर्चना देशमुख























२ टिप्पण्या:

  1. मधुसूदन ज्यो मुळीक१ मे, २०१२ रोजी ९:२७ AM

    महाराष्ट्राची व्यथा आणि यशोगाथा
    केलीत एका कवनातून व्यक्त
    असे प्रतिभावंत कवि आमच्या महाराष्ट्रात

    उत्तर द्याहटवा
  2. सध्या परिस्थितीचे चपखल शब्दातील सुरेख वर्णन.
    असेच लिखाण चालू ठेवा.

    उत्तर द्याहटवा