स्वातंत्र्य मिळाले येण्या सुबत्ता, नांदते म्हणे आता येथे लोकशाही
अर्चना देशमुख
शोषितांच्या विटंबना नी शेतकर्यांचे गळफास पाहतो आपण याची डोळा याची देही
"गरीबी हटाओ" चे नारे देत नेत्यांनी भरले आपलेच खिसे
भुकेकंगालांची पोटे खपाटीला, कारण घरांचे पोकळ वासे
भ्रष्ट विचार, भ्रष्ट आचार, सुखविलासांनी नेते धष्टपुष्ट
महागाईमुळे त्रस्त जनतेचे दिवसेंदिवस वाढताहेत कष्ट
झाडाचे जसे पानही हलत नाही वार्याच्या झोताशिवाय
कितीही रान उठवले तरी होतंच नाही काम पैसे ओतल्याशिवाय
भ्रष्टाचाराविरुध्द आता अण्णान्नी पुकारले आहे रणशिंग
प्रशांत भूषण, केजरीवाल, किरण बेदी या सहकार्यां संग
मनी आहे आस फक्त जनकल्याणाची, लोकांच्या सुखक्षेमाची
होवो कितीही त्रास आता, नाही पर्वा स्वत:च्या देहभानाची
युध्द आहे पण तरीही हाती धरणार नाही कोणतेही शस्त्र
सत्य, निष्ठा, शांतीसोबत उपोषणाचे अवलंबले अस्त्र
सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो आहे, मराठी माणसाची वाढवली आहे शान
जनमताच्या रेट्यापुढे सरकारलाही तुकवावी लागेल मान
अण्णांच्या उपोषणाने रामलीला मैदानही झाले आहे अति दग्ध
लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी सुजाण जन आहेत कटीबध्द
"यतो धर्मस्ततो जय:" असे भगवंतांनी दिले आहे प्रमाण
त्याच्या सत्यतेसाठी सामान्य जनांचे गोळा झालेत पंचप्राण
संपेल उपोषण, झुकेल सरकार, पण होईल का भारत भ्रष्टाचारमुक्त
तेजस्वी भारताच्या नवनिर्मितीसाठी होईल का सारी जनता उद्युक्त ?
archana ...hatts off ...mast utarlay lekhani tun ........
उत्तर द्याहटवा