दिवसाची सुरवात होई तिच्या आवाजाने
मधुर स्वरांच्या भिजलेल्या प्रेमाने
कधी लटका राग, कधी विनवणी
धडपड मुलांच्या कल्याणाची
जवळ असता न कळे किंमत
एका आवाजासाठी किती धडपड?
आशीर्वाद सदा पाठीशी
आठवणींचे झुले झुलती
मग हुरहूर कशाची?
नात्याची किंमत शिकवलीस सदा
फुलताना हळुवार फुंकर घातलीस सदा
आठवांचा झरा वाही सदोदित
वाहणाऱ्या मनाला आवरलेस नेहमी
दिले जे तू भरभरून
घेण्याचा प्रयत्न केला
ओंजळीतून कधी कधी निसटून गेला
न खंत न दुखं
मिळालेल्या क्षणांना उपभोगण्याची आस.
bhavana...mast lihilays
उत्तर द्याहटवाभावना, भावनांनी ओथंबलेले काव्य, खरंच, आईबद्दल बोलावे, लिहावे तेवढे कमीच गं !
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाभावना छान झाली आहे कविता, येउदेत अजून.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवा