आम्ही ह्या गांधी वाड्यात राहायला आलो १९६९ साली; मला हे एकदा न्ह्वे अनेकदा ऐकविण्यात आलंय. जसं जसा मी मोठा होत गेलो, तसं तसं वेळोवेळी शेजाऱ्यां कडून ऐकलंय "मधूची आई, मधु केवढा मोठ्ठा (म्हणजे मोटा न्हवे!!!) झाला... नाही? दोन महिन्यांचा होता इथे आलात तेव्हा". आम्ही चार भावंडं विजय (अण्णा), सुनंदा (मोठी ताई ), सुषमा (छोटी ताई) आणि मी शेंडेफळ. माझं नाव मधुसूदन पण वाडा आणि ओळखीचे डोबिवलीकर ह्यांच्या साठी मी मधुच, आणि आमची आई "मधुची आई"; थोडी अतिशयोक्ती केली तर, साने गुरुजींच्या श्याम नंतर मधुच! आणि श्यामच्या आई नंतर मधूची आईच!!
वाड्यात सगळ्या भाडेकरूंना दोन दोन खोल्या आणि तिन्ही घरांना मिळून मोठ्ठा ओटा. आम्ही राहायचो तळमजल्यावरच्या एक नंबरच्या घरात. मी म्हणे, बालपणी कधी रांगलोच नाही, एकदम बसायलाच लागलो आणि चालाण्याआधी फिरायचो कसा माहीत आहे? बसून मांडी घालायची, दोन्ही हात खांद्याच्या पातळीत सरळ पुढे धरायचे आणि मग असेच मांडी घातलेल्या अवस्थेत पुढे पुढे सरकायचे. हे उपद्व्याप बघण्यासाठी सारे शेजारी माझ्या मागे. ते सांगतात, मी असा वेगाने ओटाभर फिरायचो आणि पार्श्वभाग सोलून निघायचा. आम्ही सगळीच भावंडे लहानपणापासून तब्ब्येत राखून, त्यामुळे वाड्यातल्या सगळ्यांना भारी कौतुक, जो तो यायचा आणि घरी खेळायला न्यायचा.
आमच्या या दोन खोल्यांच्या घरात आम्ही चार भावंडं, आई, वडील, आणि आजी असे सातजण राहायचो. आत्ता विचार केला तर वाटत, कसे राहायचो आपण? आणि बरं जागा लहान पडते असं कधीच जाणवले नाही. अर्थात तेव्हा आम्ही लहानही होतो म्हणा, पण तळमजल्यावरचे घर, सगळेजण बोलके (जरा जास्तच माणसाळलेले), उत्साही, आई आणि बहिणींना विविध छंद , सगळ्या बिऱ्हाडांच्या किल्ल्या, घरी नसलेल्यांचे किराणा सामान / ग्यॅस सिलिंडर ह्यामुळे घरात कायम माणसांचा राबता. त्यावेळी प्रायव्हसी, मुलांचा अभ्यास ह्याचे अवडंबर नव्हते. आमचे वडील एका जर्मन कंपनीत नोकरीला होते. त्यांना शिफ्ट असायच्या आणि उरलेल्या वेळेत ते प्लंबिंगचा व्यवसाय करायचे. त्यामुळे सगळ्यांना मुक्तांगण, त्यांच्या दुपारच्या आणि रात्र पाळीला रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फड रंगायचे.
अहो पूर्वी वाडासंस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती आली नव्हती, तेव्हा किती सोशल लाईफ होतं बघा, वाड्यात कोणीही, कधीही, कुणाहीकडे जायचं. मदतीसाठी किंवा कामासाठीच नाही हं! अगदी सहज, “काय चाललंय? जेवण झालं का? येता का जरा बाहेर? जरा दोन कांदे द्या हो”, इतक्या सहजपणे. वेळप्रसंगी मदत तर आपोआप यायची.. ती मागावी लागायची नाही. मुलांना शिस्त लावणे, रीतीभाती शिकवणे, कौतुक करणे वेळप्रसंगी ओरडणे, पाठीत धपाटा घालणे हे त्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता शेजारच्यांकडून नकळत व्हायचे. गंमत होती की नाही? घरी गोड धोड केलं की वाटीभरून शेजारी दिल्याशिवाय घास घश्याखाली उतरत नसे. वाड्यात कुणाकडचेही कार्य म्हणजे वाड्याचेच व्हायचे. शेजारचे काका, काकू, मामा, मामी अगदी सहजपणे, ‘’मधु जरा दुकानातून काडेपेटी आणून देना, पोस्टातून चार कार्ड आणणं. कधीही कुणाचेही काम करतांना; आपण ह्यांची कामं का करायची? हे आपल्यालाच का सांगतात? असा प्रश्न आम्हा भावंडांच्या किंवा आई वडिलांच्या मनाला कधीही शिवला नाही. सगळेचजण एकमेकांना अशी मदत करायचे. असे आपण हल्ली करु शकतो का? मुलांना काही कळण्याआधीच पालकांच्या मनात वरचे दहा प्रश्न येतात आणि मग मुलं कित्येक अनुभवांपासून वंचित राहतात.
मला आठवतंय आम्ही मुलं काकवा, मावश्यांना उडदाच्या पापडांचे पीठ खलबत्यात कुटून द्यायचो आणि लाट्या हक्कानं खायचो, कुणाहीकडे कुरडया केल्या की चिक खायला जायचो, बदल्यात कुरड्या, चिकवड्या, बटाट्याचा खीस ह्या वाळवणांची राखणं करायचो. वाड्यातल्या झाडाच्या कैऱ्या तोडून सगळ्यांना वाटायचो.
आमच्यापेक्षा मोठ्ठे म्हणजे माझा भाऊ, बहिणी, त्यांचे मित्र ह्यांनीच आम्हा मुलांना विहिरीत पोहायला शिकवलं. शिकवणं म्हणजे, अक्षरशः घाबरून पळणाऱ्या मुलांना उचलायचे आणि तसेच रडत ओरडत असतांना विहिरीत फेकून द्यायचे, खाली बाकीचे तयारच असायचे. असे आम्ही पोहायला, सायकल चालवायला कधी शिकलो कळलंच नाही. हो! आणि हे सगळे करण्यावर पालकांचाही आक्षेप नसायचा हे विशेष.
अशा या आमच्या वाड्यात सगळे सण साजरे व्हायचे, म्हणजे होळी, धुळवड, गणपती, दसरा, दिवाळी वगैरे. आमच्या मालकांकडचा गणपती हे सर्व डोंबिवलीकरांचे मोठे आकर्षण होते. त्यांचा एक मुलगा जे जे कला महाविद्यालयाचा कलाकार आहे, ते मोठ्ठी आरास करायचे. त्यांनी केलेली ताज हॉटेल, हिमालय याची आरास माझ्या अजूनही स्मरणात आहे. आरास बघण्यासाठी खूप गर्दी व्हायची आणि मग रांगा लावणे, प्रसाद देणे ही कामे वाड्यातली मुलं करायची. साहजिकच अशा प्रसंगातून आम्ही बरेच काही शिकलो.
पूर्वी हल्लीसारखी, अशी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत शाळा नसायची, ती सकाळचे वर्ग आणि दुपारचे वर्ग अशी दोन वेळा असायची, त्यामुळे सकाळी शाळेतून आलो की अभ्यास करून संध्याकाळी खेळण्यासाठी मोकळे आणि दुपारची शाळावाले संध्याकाळी खेळून रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यास करायचे. वाड्यातल्या मैदानात आम्ही भरपूर खेळायचो. कधी कधी तर लगोरी, डबाऐसपैस, आट्यापाट्या हे खेळ आम्हा मुलांच्या आयाही आमच्या बरोबर खेळायच्या, खरंच खूपच मजा यायची. छोट्या ताईला भातुकली खूप आवडायची. ती आम्हा मुलांना गोळा करायची आणि आम्ही काड्याकुडया गोळाकरून मातीच्या छोट्या चुलीवर भात करायचो, खरा खरा ! आंब्याच्या दिवसात, वाड्यातल्या झाडाचे आंबे तोडून रस करायचो, प्रत्येकाने स्वतःची ताट, वाटी आणि पोळ्या घरून आणायच्या आणि मग मस्त अंगत पंगत. खरंच आम्ही नशीबवान म्हणूनच असे बालपण मिळाले, हल्लीच्या मुलांकडे बघून वाटते ह्यांना बिचाऱ्यांना कल्पनाही नाही, की ह्यांनी काय गमावले आहे.
(क्रमशः)

मधुसूदन मुळीक
|
खूप छान लिहीताहात...... मज्जा येतेय वाचायला :)
उत्तर द्याहटवाहोय अगदी बरोबर..खुपच छान लिहीता आहात. लहानपणच्या आठवणी वेगळ्या असतील प्रत्येकाच्या पण जाग्या जरूर होतील. मस्तंच..
उत्तर द्याहटवाशुभकामना..
खूपच छान साहेब..
उत्तर द्याहटवामाझा धाकटा भाऊ, रमेश पण असाच पुढे सरकायचा तो कधी रांगलाच नाही. आणि विशेष म्हणजे तो आपल्या चालण्याच्या वेगाने पार्श्व भागावर पुढे सरकायचा. आम्हास खूप मजा वाटायची त्याला तसे पाहताना .. असो..
तुम्ही छान लिहिता , लिहीत राहा आम्ही वाचत राहू
दिनेश कुमठेकर
kharach Flash back madhe netay tumhi ....mast lihitay ...asech khup khup bhag yeudyaat
उत्तर द्याहटवा'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ' सर्वांनी हे ध्यानी घेतले तर........
उत्तर द्याहटवाnostalgic ही करता आहात वाचकांना त्यांच्या बालपणात नेऊन !
मधूच्या आईच्या भेटीचा योग मात्र यायला हवा लवकर, असे छान संस्कार करणारी माउलीही धन्य !
Hello !
उत्तर द्याहटवामधु .. ( मधु चं तोंडात बसलाय .... विजू ला " विजू दादा " पण .... तुला .. मधुच ... वयाने १०-१२ वर्षांनी मोठा असला तरीही ... )
माझ्या आई , बाबांना ... 'मधुची आई' पण ... आम्हाला मात्र 'मुळीक वाहिनी' ... ( आणि आता बाबा त्यांना .. 'मालकीण बाई' !! म्हणतात...)
आमच्या बालपणात .... मोठ्ठा वाटा जर कुणाचा असेल तर .. तो "मुळीकांचा" ! एक जिवंत कुटुंब ... लहानपणी अगदी .. पडीक ..... असायचो "मुलीकांच्या" घरात पडीक .... म्हणजे चप्पल घरी नाही मिळाली कि ती हमखास ... तुमच्या घरात मिळणार !!! आम्ही काही पोहायला नाही शिकलो .. कारण तोपर्यंत ... 'वाड्याची' "Buidling " झाली होती .... आणि तू म्हणतोस त्या विहिरीची 'शान' गेली होती ... हो पण नाही म्हणायला ... विहिरीतून 'फूल ' आणि ' ball ' काढायला मजा यायची ...
ऋचा लेले
hello Madhu,
हटवाTu atishay sunder lihitos...mi sarva char bhag vachale...mala tu bhut kalat gheun gelas...and today I tell you... purna gandhi vadyat...Best family was Mulik family...everyone is great..the best neighbour anyone can have,
Love, Arunatai