साहित्य :- १) १ माध्यम आकाराची काकडी (तवसं)
२) पाव चमचा (छोटा) मेथी दाणे
३) दीड चमचा (छोटा) मोहोरी....शक्य असेल तर लाल मोहरी
४) २-३ सुक्या लाल मिरच्या
५) दही
६) २ मोठे चमचे नारळ खरवडून
७) चवी नुसार मीठ
कृती :-
- प्रथम काकडी सोलून बारीक फोडी करून घेणे
- मेथी थोडयाशा तेलावर परतून घेणे
- त्यातच मिरच्या पण परतणे
- मिक्सर मध्ये नारळ मेथी दाणे मोहरी आणि मिरच्या हे बारीक वाटावे. ( मोहरी चा १ झणका आला पाहिजे)
- हे सर्व काकडी च्या फोडीना लाऊन घेणे त्यात दही आणि चवीनुसार मीठ घालून निट कालवणे
- थोड्या तेलाची मोहरी हिंग आणि हळद घालून खमंग फोडणी करून वरील काकडी च्या मिश्रणाला देणे.
![]() |
मृण्मयी आठलेकर |
मृण्मयी, छान आहे रेसिपी ! बरेच दिवस विस्मरणात गेलेली, आता करेन नक्की.
उत्तर द्याहटवाहम्म खरच खूप छान लागत हे लोणचं!...नक्की करून बघा
हटवा