नमस्कार, महाराष्ट्र मंडळ कुवेतचा प्रतिभाकुंज हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम, ह्यामुळे अनेक चित्रकार, कवी, लेखक प्रकाशमान झाले. माझा ह्यात लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न. मंडळी कुवेतमध्ये नवरे लोकांना रोजची दोन मुख्य कामे असतात. एक म्हणजे रोजीरोटी साठी जाणे आणि दुसरे घरी आले कि मुलं आणि बायको ह्यांची अनुक्रमे विविध शिकवण्या वर्ग / वाढदिवस / ममंकुच्या कार्यक्रमांचा सराव, सौंदर्य प्रसाधनगृह / किटी पार्टी ह्यांना ने-आण करणे. ह्यातून माझीही सुटका नाही, त्यामुळे मनात असूनही लिखाणास जरा वेळच झाला. माझी इच्छा आहे 'वाडा आठवणींचा' हे साप्ताहिक सदर द्यायची, त्यासाठी मी माझी पत्नी सौ. गीता हिची मदत घेणार आहे (आणि तसे तिने सध्यातरी कबूल केले आहे) मी हस्तलिखित देणार आणि ती त्याचे शुद्धलेखन, टंकलेखन करून प्रतिभाकुंजला पाठविणार. बघूया आपला उत्साह.
(माझा लिहायचा, सौ चा टंकलेखनाचा आणि तुमचा वाचण्याचा) कितीसा टिकतोय?
वाडा आठवणींचा (भाग पहिला)
आपल्या सगळ्यांचा खूप जिव्हाळ्याचा, अगदी हृदयात कोरला गेलेला काळ असतो, तो बालपणीचा. तो कसाही असो, कितीही सुखात, दुखात पण तो काळ अगदी स्वच्छ आठवतो. आणि जसे जसे वय वाढते तसा-तसा त्याबद्दलचा जिव्हाळा आणखीच वाढत जातो. हाच काळ मला घट्ट धरून ठेवायचा आहे आणि त्यासाठीच प्रयत्न करतो आहे त्याला शब्दात पकडण्याचा. बघा तुम्हीही जरा...भूतकाळात गेलात, आणि आठवले ना बालपण? आपले जुने घर, शेजारी, शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक, तुमची खेळणी? आणि तुमच्या एक लक्षात आलंय का? कि आपल्याला सुरवातीचे म्हणजे इयत्ता पहिली ते साधारण चौथी पाचवी ह्यावेळचे मित्र, वर्गशिक्षक ह्यांची नावे, चेहेरे खूप चांगले लक्षात आहेत आणि तेच जास्त जवळचे वाटतात पण तसे महाविद्यालय आणि त्यापुढचे नाहीत. म्हणूनच हा वाडा आठवणींचा. माझे सगळे बालपण ह्या वाड्यातच गेलं. डोंबिवली पूर्वेला प्रसिद्ध गणपती मंदिराजवळ असलेला गांधी वाडा. तेव्हा डोंबिवली खूप छान होती. गर्दी रहदारी इमारती सगळेच कमी होते. वाड्यासमोर एक मोठी बाग होती आणि बागेला लागून रेल्वे लाईन. आमचा वाडा म्हणजे एका मजल्यावर तीन अशी तीन मजली बिल्डींग, मालकांचा बंगला, बंगल्यात तळमजल्यावर तीन भाडेकरू आणि बंगल्याच्या जिन्याखाली एक ब्रम्हचारी भाडेकरू, मोठ्ठं मैदान आणि एकाबाजूला चौकोनी विहीर. मोठ्ठं मैदान असल्याने आमचा वाडा हा आजूबाजूच्या मुलांचा खेळाचा अड्डाच होता. विहीरही साग्रसंगीत होती बरं का! दोन बाजूला रहाट, कपडे धुवायचा मोठ्ठा दगड, मोरी, त्यावर सिमेंट चा पत्रा आणि कडेला शौचालय. मालकांच्या बंगल्याला पहिल्या मजल्यावर छोटी बाल्कनी होती, त्यावरचा रहाट बरोबर यायचा विहिरीवर. वाड्यात गुलमोहर, रातराणी, पांढरा आणि हिरवा चाफा, बकुळ, तगर, अनंत, प्राजक्त, आंबा, पेरू, जांभूळ, सीताफळ, रामफळ, जाम,शेवगा इतकी सगळी झाडं. मालकांची (गांधी आडनांव नावापुरतेच, अजूनही त्यांचा उल्लेख मालक म्हणूनच) छोटी आणि तळमजल्यावरच्या बिराडांच्या स्वतःच्या छोट्या छोट्या बागा. हे सगळे इतके तपशीलवार ह्यासाठी कि पुढे पुढे हे सगळे येणार आहेत आपल्या भेटीला. तर मंडळी आज ह्या वाड्याबद्दलच, आपण पुढेपुढे भेटणार आहोत ह्या वाड्यातील माझ्या बालपणाला आणि एकेका शेजाऱ्याला.
मला हे लिहिताना खरच माझ्या बालपणात आणि वाड्यात गेल्यासारखं वाटतंय. अहो किती लहान झालो, मी ह्या प्रस्तावनेतच. तुम्हीही वाचा आणि जा हरवून तुमच्या बालपणात.
क्रमशः

मधुसूदन मुळीक |
अतिशय छान. वाचण्याचा अजिबात कंटाळा येणार नाही. येऊ द्या येऊ द्या.. प्रतिक्षेत आहे...
उत्तर द्याहटवाekdam mast...nakki yeudyaat ...shubhechhaa...
उत्तर द्याहटवावा ! ....बालपण देगा देवा ही उक्ती सार्थ करणारा लेख ! वाड्यातील आणखी आठवणींसाठी उत्सुक आहोत.
उत्तर द्याहटवाKhup chan , best of luck.
उत्तर द्याहटवाVIshwajeet
Very good initiative Sir! Childhood days r the best part of our lives ,looking forward for the continuation as 'me pan Dombivlikar" :)
उत्तर द्याहटवामुळीक सर काय मस्त सुरवात आहे हो!!!
उत्तर द्याहटवाझुळूक जणू... लेखात आलेली शांतता ही नक्की वाड्यात होती असणार... सुरवात इतकी मख्खन आहे खात्री आहे रंग प्रत्येक भाग गणिक गेहरा होईल... लेखातला शांत असा बालीशपणा खूप आवडला सर!!!
धन्यवाद...