रविवार, २२ एप्रिल, २०१२

श्रीमती सुधा गुप्ता

श्रीमती सुधा गुप्ता   पूर्वाश्रमीच्या पुष्पा गोविंदराव  शिंदे यांचा जन्म महाराष्ट्रात नंदूरबार येथे झाला. मुंबई ला बी.ए. पर्यंतचे शिक्षण व नंतर थोडे दिवस पोस्ट-टेलिग्राफ खात्यामधे टेलीफोन ऑपरेटर म्हणुन मुंबईतच नोकरी करून लग्नानंतर त्या कुवेत ला आल्या व परिवारासोबत कुवेतला स्थायिक झाल्या. १९७३ नंतर त्यांनी समाजकार्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले.

१९५९ साली स्थापन झालेल्या व साधारण १०० सदस्य असलेल्या Kuwait Ladies Association मधे त्यांनी कोषाध्यक्षा म्हणून काम सुरू केले. ह्यात महीन्यात एकदा सर्व महिला भेटत, खेळ व निरनिराळ्या स्पर्धांचे त्यात आयोजन केले जात असे. तसेच ही संस्था kidney transplant वगैरे संबंधित रोग्यांना पैशाने पण मदतीचा हातभार लावित असे.

श्रीमती गुप्ता राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय (Ladies International League (LIL), ज्यात १४ देशांच्या महिलांचा समावेश होता. त्यांनी Co-Chairperson चे पद भूषविले होते.

श्रीमती सुधा गुप्ता ह्यांचा महाराष्ट्र मंडळ कुवेत सुरू करण्यात मोलाचा वाटा आहे.

त्या तीनदा मंडळाच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. मंडळातील सभासदांच्या मुलांना संस्कृत व मराठी भाषचे ज्ञान असावे म्हणुन सतत प्रयत्नशील होत्या. महाराष्ट्राच्या परंपरा जपल्या जाव्यात असे त्यांचे नेहीमी सांगणे असे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील अंध संस्थांना, लातूर भूकंप पीडितांना मदतीचा हातभार महाराष्ट्रमंडळाकडून लावण्यात आला होता.

१९९८ पासून त्या Indian Women’s Association च्या अध्यक्षा होत्या. त्यांनी अडचणीत असलेल्या बऱ्याच भारतीय कामगार स्त्रियांना मदत केली होती. कधी कोणाला खाऊ घालणे तर कधी कोणा गरजवंताला भारताचे तिकीट काढण्यास मदत करणे, अपंगांना सहाय्य तर त्यांचे अविरत चालूच होते.

Indian Women’ League मधे पण त्यांनी काम केले होते.

त्याचबरोबर त्यांचा बाकी भाषीय मंडळांशी पण जवळचा संबंध होता. उपकार ह्या उत्तर प्रदेश च्या मंडळाचे पण कोषाध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते.

अशा मंडळांमधे त्यांना सत्यनारायण पूजा करायला बसण्याचा मान मिळाला होता.

कुवेत मधे येणाऱ्या प्रतिष्ठित भारतीय मंडळींमधे अटल बिहारी बाजपेयींना भेटणाऱ्या मंडळींमधे त्यांचा समावेश होता.

अशा ह्या प्रतिभाशाली श्रीमती सुधा गुप्ता ह्यांना १६ जानेवारी २००५ साली देवाज्ञा झाली.

त्यांना महाराष्ट्र मंडळ कुवेत कडून विनम्र आदरांजली.
(शब्दांकन दीपिका जोशी)

श्रीमती सुधा गुप्ता
श्रीमती सुधा गुप्ता





श्री रामचंद्र गुप्ता

२ टिप्पण्या:

  1. खूप छान माहिती मिळाली.
    महाराष्ट्र मंडळ सुरु करण्यामागे श्रीमती सुधा गुप्ता ह्यांची धडपड होती हे वाचून त्यांचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. कारण त्यांच्या ह्या प्रयत्नामुळे आज आपलं महाराष्ट्र मंडळ कुवेतमध्ये सगळ्या मराठी माणसांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम तितक्याच उत्साहाने आणि जोमाने करतंय !!
    श्रीमती गुप्ता ह्यांना आदरांजली !!

    उत्तर द्याहटवा
  2. श्रीमती गुप्ता यांच्या कुवेतमधील मराठी मंडळाच्या व त्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामाला सलाम.
    सुंदर शब्दांकन व मांडणी.

    उत्तर द्याहटवा