मंगळवार, ८ मार्च, २०११

जागतिक महिला दिन


"जागतिक महिला दिन" हा दरवर्षी ८ मार्चला साजरा होतो.  असा विचार मनात आला की जागतिक महिला दिन साजरा करायला खरंच कधी सुरुवात झाली असेल? काय कारण घडले असेल तो दिवस  जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला गेला. तर माहिती शोधत असताना असं आढळून आलं की ८ मार्च १८५७ ला Garments Factory त काम करणार्‍या कामगार  बायकांनी New York City च्या रस्त्यावर कमी पगार, १२ तास काम करायला लागणे आणि अमानुष  परिस्थिती ह्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला. पोलिसांकडून ह्या मोर्चावर हल्ला झाला, काही बायकांना तुरुंगात टाकण्यात आले तर काही बायका हल्ल्यात जखमी झाल्या. पुन्हा   मार्च १९०८ ला बायकांनी मोठ्या प्रमाणात  त्याच गोष्टीसाठी आणि बालकामगार  बंद  करा ह्या साठी   मोर्चा  काढला.  त्या  वेळी ३०,००० बायका   मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. "International Labor Movement" नी १९१० ला ८ मार्च हा  "International Day of Working Women"  म्हणून घोषित केला आणि नंतर तो दिवस "जागतिक महिला दिन" म्हणून साजरा केला जाऊ लागला.

हे वाचताना मुठभर अंगावर मांस चढल्याशिवाय राहिले नाही. स्त्री ही वेगवेगळ्या आघाड्यांवर एकाचवेळी लढत असते . घर, मुलं आणि नोकरी अशी तिची तारेवरची कसरत चालू असते. असं असताना सुद्धा ती तिचा संयम व्यवस्थित सांभाळून असते. नोकरीतील वेगवेगळी आव्हाने पेलायची असतात. संसाराची गाडीसुद्धा हाकायची असते. आयुष्यभर अस्तित्वाची लढाई चालूच राहते. सरळ साध्या आयुष्यात पण तिची किती वेगवेगळी रूपं ! आई होऊन ती घारी सारखी स्वत:च्या पिल्लांचं रक्षण करते, तर  मुलगी बनून आईवडिलांना आधार देते, सहचारिणी होऊन   आयुष्यभर नवर्‍याच्या खांद्याला खांदा देऊन त्याच्या बरोबरीने उभी राहते, तर बहिण होऊन भावाला जपणारी पण तीच असते.  व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. पण इथे तर दुर्गा, काली व मदर मेरी ही वेगवेगळी रूपं फक्त स्त्री ची. 

ह्या दिनाच्या निमित्ताने स्त्रीशक्ती - आदिशक्तीला मानवंदना ! आपल्या कर्तृत्वाने, करारीपणाने ज्या स्त्रिया लढल्या त्यांची आज आठवण होणे क्रमप्राप्य. प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे. शिवरायांमुळे मराठी माणूस महाराष्ट्रात टिकला, उभा राहू शकला. पण शिवरायांना घडवणारी जिजाऊ होती. जर शिवरायाने परत जन्म घ्यावा असं वाटत असेल तर जिजाऊ हव्याच. जिजाऊ असली तर शिवबा होणार. आपल्या बाळासाठी अवघड कठीण असा बुरुज चढून जाणार्‍या हिरकणीला आणि  "मेरी झांसी नहीं दूंगी" अशी गर्जना करणार्‍या झाशीची राणी, लक्ष्मीबाईला कोण विसरणार ? स्त्रीशक्तीचे रूप ह्याहून वेगळे असे काय असणार

मुल अडीच वर्षाचे झाले की आपण त्याला Montessori  च्या  वर्गात पाठवतो. ही Montessori सुरु करणारी होती  "Maria Montessori". स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. समर्थपणे देशाचं नेतृत्व करणार्‍या "SIRIMAVO BANDARANAIKE", "INDIRA GANDHI", "BENAZIR BHUTTO", "PRATIBHATAI   PATIL" असो किंवा मुलांना कर्तबगारीने मोठी करणारी आणि तितक्याच हुशारीने  पक्षाचे नेतृत्व करणारी "सोनिया गांधी" असो प्रत्येक जणी आपल्या जागी उच्च होत्या आणि आहेत. अंतराळा  गवसणी घालणार्‍या कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्सला सलाम.  

शकिराच्या गाण्यावर नाचता येत नसणार्‍याची पावले सुद्धा थिरकतात. वर्षानुवर्षे रसिकांवर आवाजाने मोहिनी  घालणार्‍या लता मंगेशकर, आशा भोसले  ह्यांना तरी कुठे तोड आहे. सौंदर्याची मोहिनी घालणार्‍या, SAMANTHA FOX, मधुबाला, माधुरी दिक्षितअशी किती उदाहरणे द्यायचीखेळामध्ये बोलायचं तर टेनिस जगताने Martina Navratilova, Steffi Graf आणि Monica Seles चा झंझावात अनुभवला आहे. सानिया नेहवाल ह्या badminton पटुने भारताचे नाव उंचावले आहे. आज कोणतेही क्षेत्र असे उरलेले नाही जिथे स्त्रियांनी आपला ठसा उमटवलेला नाही.


Three Cheers to Women, for Yesterday, Today and Tomorrow !!!







सौ श्रुति हजरनीस 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा