शनिवार, २६ मार्च, २०११

वाळूची वादळे


मुद्दामच हे शिर्षक वापरले! जयूजींचा पूर्वी वाचलेला ब्लॉग अस्सा डोळ्या समोर उभा राहिला काल...!!

धुळीचे लोट... अहं धुळीचा ढगच म्हणा! चारीही बाजूंनी चौफेर खूर उधळत एक एक इमारत, मशिद आणि मैदान पादाक्रांत करत असा चालून येत होता की आपण निसर्गाची एक वेगळी शक्ती अनुभवत आहोत हे प्रत्येक रोमांच सांगत होतं. पहिली दोन मिनिटे मी फक्त स्तब्ध उभा राहून बाहेरचा नजारा (खरतरं तांडव) पाहत होतो. डोळे सताड उघडे आणि पाय एका बाल्कनीतून दुसर्‍या खिडकी कडे नाचवत होतो. हा शुक्रवार नवीनच अनुभव घेऊन आला होता.

शुक्रवार म्हणून घर आवरत होतो. नेहमी येणार्‍या शुक्रवार प्रमाणे हा ही एक कंटाळवाणा पण घरी राहायला मिळणारा शुक्रवार होता म्हणून ताणून झोपलो होतो... दुपारी उठून आवरा आवर झाली आणि भारताचा दुसरा राष्ट्रीय खेळ आणि आमचा रोमा रोमांत भिनलेला क्रिकेट पाहत होतो. संध्याकाळ व्हायलाच आली होती आणि आळस काढायला म्हणून बाल्कनीत येवून पाहतो तर खाली अरबी आणि बाकी लोक आकाशाकडे नजर खिळवून काहीतरी पाहत होते. साहजिकच मी ही आपली मान वळवली आणि आकाशाकडे पाहू लागलो. हलकी धूळ ! ह्यात काय एवढं? ह्या अरब्यांना काहीही अप्रूप वाटतं, म्हणून मी परत घरात जाणार तेवढ्यात माझी नजर थोड्या दूर वरून दिसणार्‍या काळ्याकुट्ट आणि पूर्ण क्षितिजाची व्याप्ती असलेल्या ढगावर खिळली... ओह तेरी! हा काय प्रकार?

काही फर्लांगावर असलेलं तारांकित हॉटेल रमदा आणि त्यांचा Neon  sign  दिसत आहेत. एक ४-५ सेकंद्स झाली असतील…. ते तारांकित हॉटेल दिसत 'होतं' असं म्हणायला लागलं! आता लक्षात येत होतं ही  निसर्गाची अजून एक भयावह अदा आहे! अदा अश्या साठी म्हटले की ज्या लटक्यात एका सुंदर सांजेचं रुपांतर एका काळोख्या रात्रीत जश्या रीतीने झालं ती अदाच असावी. ह्या अदेला वाळूचं वादळ म्हणतात, a  dust storm.  आणि ते समोरून भरधाव वेगाने आणि चोहोबाजूंनी जमीन काबीज करत येत होतं!

आता पर्यंत एक दहाबारा पावलांवर असलेली मशिद ही गिळंकृत झाली होती! एखाद सेकंद मी बाहेर होतो आणि रेती सपासप मानेवर आणि चेहर्‍यावर आदळू लागली... धाव रे वेड्या! म्हणून धपकन घरात उडी मारली आणि बाल्कनीच दार बंद केलं. आता समोर लख्ख अंधार... घराखालच्या रस्त्यावरचे दिवे ही नाहीसे झाले!!! असा अंधार!!! त्याच वेळी बरेच विचार मनात येत होते... वाळूने ही स्थिती आहे तर त्सुनामी काय तांडव असेल ! जयूजींनी  त्यांच्या ब्लॉग मध्ये अश्या वादळाची कल्पना दिली होती... पण हा थरार आज ह्याची देही ह्याची डोळा’ अनुभवत होतो...

एक १० मिनिटात घरात Super Fine धुळीचं साम्राज्य झालं होतं. पायाचे जमिनीवर ठसे उमटत होते. आता....!! थोडं adventure करायचं मन झालं आणि चेहर्‍यावर आणि डोक्यावर बंडाना बांधून लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्टबाई आल्या आणि तळ माळ्यावर आम्ही पोहोचलो... ,,३....!! दार उघडलं.....तोच एक जोरात हिसका आणि पोतंभर धूळ आत शिरली... बाहेर आलो तर मोझाईक टाईल्सवर त्याच superfine धुळीचं छोटेखानी  वाळवंट तयार झालं होतं. प्रकाश.... विश्वासा बरोबर पानिपतात गेलेला... तरी नाही म्हणायला गाड्यांचे  hazard दिवे दिसलेगाडी दिसली नाही.

तसं दिवस लहान असल्यामुळे रात्र लवकरच येते इथे म्हणा पण आज तर अंधारात रात्र कधी आली कळलं नाही. कळणार ही नव्हतं. आता रस्त्याचे दिवे टीम टीम दिसत होते. थोडा पुढे आलो आणि पुन्हा मागे फेकला गेलो... अबब! काय त्या वार्‍याचा जोर ! आणि त्या वार्‍या बरोबर वाहणारी धूळ तोंडावर बांधलेल्या कापडावर सटासट आदळत होती... काना मध्ये अजून ही ते आवाज घुमत आहेत. वारा वेड्या सारखा इथून तिथे धावत होता.  सोबत ची धूळ वेगवेगळ्या रेषा आखत वार्‍याबरोबर नाचत होती. जमिनीवर टेकत होती आणि पुन्हा वार्‍याच्या संगतीने आकाशात झेपावत होती... अनाकलनीय होतं सारं पण पहावंसं फार वाटत होतं.

नाक्या पर्यंत कसाबसा पोहोचलो आणि परतलो, मुद्दामच हात उघडले मनात वेडा विचार आला एखादा सेंटीमीटर तरी उडू... पण छ्या... पुन्हा चालतच घरा पर्यंत पोहोचलो. तोपर्यंत लिफ्टच्या आत वाळू वाळवंट बनून प्रस्थापित झाली होती तिथे स्लीप्पर्स काढून पायाचा  ठसा उमटवला J का कुणास ठाऊक थोडासा बालिश झालो होतो. पण तरी मस्तीत होतो.

घरी आलो वादळ बाहेर सोडूनच तोपर्यंत किवीनी आफ्रिकेच्या सिंहाची दाणादाण केली होती.















अभिजीत पाटील

१५ टिप्पण्या:

  1. अभिजीत, अप्रतिम लिहिलं आहेस. तुझी लिहिण्याची स्टाईल एकदम खास !! समोर अक्षरश: दृश्य उभं राहिलं. तुझ्या लेखातून काल अनुभवलेलं निसर्गाचं तांडव पुन्हा अनुभवलं.

    असाच लिहिता रहा. छान आहे तुझी लेखनशैली !!

    उत्तर द्याहटवा
  2. Vividly narrated the horrifying experience. Adwait who went to cheer their Team participating in CRY cricket also had the same scary experience. Luckily the security escorted the kids to safe KOC guest house nearby. one or two snaps would have added spice to article. Anyway like it.

    उत्तर द्याहटवा
  3. तुम्हा दोघांचे ही मनापासून धन्यवाद!

    खरंतर हा अनुभवच चित्तथरारक होता आणि फोटो नक्कीच अजून जिवंत करू शकले असते... पण तो क्षण असा होता की ही शुद्धच मी हरवून बसलो होतो!

    रेपोर्टरची विचारशैली असती तर कदाचीत तेवढा तेज मी react होवू शकलो असतो... पण खैर... पुढ्च्यावेळी ही काळजी नक्की घ्येईन! :)

    उत्तर द्याहटवा
  4. he vachun aksharshaha angavar kaata aal hota...........vachatana to anubhav hi ghet hote mi...kharch khup chan lihilay

    उत्तर द्याहटवा
  5. Adventure मबरुक !!
    लेख आवडला !!

    उत्तर द्याहटवा
  6. स्मिता ताई, प्रितीजी, महेशजी, राखीजी, अर्चनाजी आणि क्रांतीजी धन्यवाद आवर्जून आपला आभिप्राय कळविल्याबद्दल.

    उत्तर द्याहटवा
  7. Abhijeet, your ability to mix thoughts with words is unique, keep up the wonderful job!!!

    उत्तर द्याहटवा
  8. Wow, Abhijit...I am little late in commenting, as I read the article now! I was not in Kuwait when this happened! You have written really really well! Your writing skills are as great as your -photography! As Avinash said earlier, photographs would have added the flavour!

    उत्तर द्याहटवा