मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०११

माझ्या चारोळ्या

क्रांती झाली ’फेस’ वर ’बुक’
काळे केले ’होस्नी’ ने मुख
स्वातंत्र्याची आता जनतेला ग्वाही
हो ’मुबारक’ लोकशाही

~~~~~~~~~~~~~~~~~~~

’माया’ व ’ती’ पुढे वर्दी झुकली
स्पर्शता चरणी, वहाण लाजली
’सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद पोलिसांचे
कर्तव्याचा पडतो विसर, तळवे चाटती पुढार्‍यांचे

~~~~~~~~~~~~~~~~~~

’कृष्ण’ शिष्टाईला शापच आहे
असफल होण्याचा
कधी हस्तिनापुरी
तर कधी न्यूयॉर्कनगरी













अर्चना देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा