साहित्य : ४ ते ५ छोटी वांगी, चिंचेचा कोळ, कढिपत्ता, मीठ, लाल तिखट, २ वाट्या जाडे पोहे, नारळ, कोथिंबीर, २ ते ३ पोह्याचे पापड, गोडा मसाला.
कृती: प्रथम चिंचेचा कोळ करुन ठेवावा. पातेल्यात तेल गरम करुन फोडणी करुन घ्यावी. (पोह्याला थोडे जास्त तेल घालावे). कढिपत्ता घालून नंतर त्यात वांग्याच्या उभ्या फोडी करुन टाकाव्यात. वांगी थोडी शिजली की त्यात चिंचेचा कोळ, मीठ, लाल तिखट घालून पूर्ण शिजून द्यावीत, आता धुतलेले पोहे घालून (पोहे जास्त धुवू नयेत, कारण त्यात चिंचेचा कोळ जाणार आहे, नाहीतर पोहे खूप मऊ होतील) त्यात चिंचेचा कोळ, मीठ, लाल तिखट, गोडा मसाला घालून चांगले वाफवून घ्यावेत. डिश मध्ये सर्व्ह करताना त्यावर नारळ कोथिंबीर व पोह्याचा भाजलेला पापड चुरुन घालावा.
वैशाली काजरेकर
Great, mouth watering recipe. Worth try.
उत्तर द्याहटवा