मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

धुंद मैफिल

सुरांच्या नभांगणी
चांदण्याची बरसात
धुंद मैफिल अंगणी
बेधुंद करी रात

रातकिड्याच्या आवाजाची
गोडी वाटे क्षणोक्षणी
दूर देवळातील घंटा
निनादे स्वर ओथंबुनी

दूर चंद्र हा हासतो
शीतल छाया लहरीतो
सुरांच्या या मैफिलीची
मदहोशी वाढवितो












भावना कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा