बुधवार, ७ सप्टेंबर, २०११

धावून ये गणेशा


ही मी लिहिलेली गणपतीची आळवणी नागपूरच्या सुबोध साठे याने संगीतबद्ध करुन गायली आहे.

काळोख पातकांचा, दाही दिशांत झाला
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा

स्वार्थात अंध झाले, सारेच मत्त झाले
वाली कुणी न आता, सारेच माजलेले
उन्माद आवराया, देवा तुझी प्रतिक्षा
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा

जगतावरी फिरुनी, साम्राज्य दानवांचे
धरबंद राहिले ना, कोणासही कशाचे
बेबंद दानवांचा, नि:पात तू करावा
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा

तू पाप, ताप, दु:खा, हरिले सदैव देवा
भक्तांस तारिले तू, अन्‌ रक्षिलेस देवा
विश्वास आमुचा हा, तोडू नकोस देवा
घेऊन सूर्य दुसरा, धावून ये गणेशा

हे गाणं तुम्ही इथे ऐकू शकता.

 धावून ये गणेशा 













जयश्री अंबासकर

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

गणपती गान



गुणाचे गान
स्वरुपाचे ज्ञान
ओमकाराची तान
गणपती गुणगान

तुझ्या मुखी एकदंत
भालचंद्र विशाल
नेत्री जागती अपार
ज्योती कोटी रात्रंदिन

भावाचा तू भुकेला
दीनांचा तू तारक
सर्वांना बघसी एक
देसी समसमान दान

तुझ्या पायी नतमस्तक मी
झालो तुझा मी रे दास
सगुण निर्गुण दयाळा तू
तारीसी सदा भक्तास

तुझे रुप, तुझी शक्ती
भक्ती करीतो रात्रंदिन
देवांचाही देव तू सकळ
त्राही माम्‌ भगवान










भावना कुलकर्णी

सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

भष्टाचार लढा

स्वातंत्र्य मिळाले येण्या सुबत्तानांदते म्हणे आता येथे लोकशाही                            
शोषितांच्या विटंबना नी शेतकर्‍यांचे गळफास पाहतो आपण याची डोळा याची देही

"गरीबी हटाओ" चे नारे देत नेत्यांनी भरले आपलेच खिसे                       
भुकेकंगालांची पोटे खपाटीला, कारण घरांचे पोकळ वासे                          

भ्रष्ट विचार, भ्रष्ट आचारसुखविलासांनी नेते धष्टपुष्ट                                    
महागाईमुळे त्रस्त जनतेचे दिवसेंदिवस वाढताहेत कष्ट

झाडाचे जसे पानही हलत नाही वार्‍याच्या झोताशिवाय                              
कितीही रान उठवले तरी होतंच नाही काम पैसे ओतल्याशिवाय

भ्रष्टाचाराविरुध्द आता अण्णान्नी पुकारले आहे रणशिंग                        
प्रशांत भूषण, केजरीवाल, किरण बेदी या सहकार्‍यां संग

मनी आहे आस फक्त जनकल्याणाची, लोकांच्या सुखक्षेमाची
होवो कितीही त्रास आता, नाही पर्वा स्वत:च्या देहभानाची

युध्द आहे पण तरीही हाती धरणार नाही कोणतेही शस्त्र                            
सत्य, निष्ठा, शांतीसोबत उपोषणाचे अवलंबले अस्त्र

सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो आहे, मराठी माणसाची वाढवली आहे शान              
जनमताच्या रेट्यापुढे सरकारलाही तुकवावी लागेल मान

अण्णांच्या उपोषणाने रामलीला मैदानही झाले आहे अति दग्ध                 
लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी सुजाण जन आहेत कटीबध्द

"यतो धर्मस्ततो जय:" असे भगवंतांनी दिले आहे प्रमाण                           
त्याच्या सत्यतेसाठी सामान्य जनांचे गोळा झालेत पंचप्राण

संपेल उपोषण, झुकेल सरकार, पण होईल का भारत भ्रष्टाचारमुक्त                  
तेजस्वी भारताच्या नवनिर्मितीसाठी होईल का सारी जनता उद्युक्त












अर्चना देशमुख

रविवार, ४ सप्टेंबर, २०११

माझी चित्रकला

ही माझी आणखी काही चित्रं




















हे पुढचं आहे - Knife Painting


आणि हे - Quilling

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.












सोनाली राणे

शनिवार, ३ सप्टेंबर, २०११

वाळवंटातलं फार्म हाऊस



FARM HOUSE म्हटलं की डोळ्या समोर येतं ते लांबच लांब हिरवगार शेत, टुमदार घर, मोकळी अशी जागा आणि शुद्ध हवा. अस एखादं FARM HOUSE बघायला भारतात मिळणं हे काय नवीन नाही.  पण हे मी असं म्हटलं की कुवेत ला सुद्धा बघायला मिळालं तर ते एखादं आश्चर्य वाटावं इतपत अशक्य वाटतं. कुवेत म्हणजे वाळवंट हे इतकं डोक्यात पक्क बसलंय की असं काही कुवेत ला बघायला मिळेल असं कधी वाटलंच नाही.

FARM HOUSE  आम्हाला  बघायला मिळालं ते आमचा मित्र राहुल गोखले मुळे. राहुलच्या मित्राचं कुवेतला farm house आहे. ते बघायची आम्हांला संधी मिळाली. १०० acre ची जागा पण काम करायला फक्त तिकडे १२ माणसे आहेत.  वाळवंटाच्या जमिनीत एकाच ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पिके वाढवली  आहेत. तिकडे आम्हांला वांगी, भोपळा, दुधी भोपळा, कोबी, cauliflower, पालक, मुळा, बटाटा अशी बर्‍याच प्रकारची फळझाडे, हिरव्या पाले भाज्या बघायला मिळाल्या.
        




















दुधी भोपळा एवढा मोठा आणि वजनदार की जणू  भीमाच्या गदेला शोभेल असा होता; तो दोन  हातानी उचलायला लागला. 



पालक पण जमिनी पासून एक फूट वरती उगवलेला
 .  वांग्याचं फुल वांगी रंगाचं खूप मोहक होतं. एका कोबीच्या झाडाला चार-चार मोठे कोबी एकदम लागले होते; कोबीचा आकार एवढा मोठा की 'मोठा'  हा शब्द पण कमी वाटत होतां. खरंतर भव्यच.

सहा फूट उंच सूर्यफुलाची झाडे एवढी कडक आणि सरळ होती की वाकवायचा  प्रयत्न केला तरी ती वाकली गेली नाहीत. फुले पण सूर्यासारखीच  भव्य  होती.



        

सगळ्या भाजीत आवडती भाजी  बटाटा   - जमिनीत  प्रत्यक्ष बघताना मजा वाटली .  मक्या ची झाडे पण तितकीच छान. शेतातल्या कोवळ्या मक्याची चव तर काय अफलातून.
"चल रे  भोपळ्या टुणूक टुणूक" असे म्हणणार्‍या आजीची गोष्ट आठवली तो  महाकाय असा लाल  भोपळा बघून. ती तेव्हा ही खरी वाटली होती आणि परत एकदा आता सुद्धा  विश्वास ठेवावासा वाटला.  हिरवे कच्चे  tomato बघून कच्च्या tomatochi  भाजी किती छान होईल हा विचार मनात आल्या वाचून  राहिला नाही.



तिकडे cattle farming, fish farming सुद्धा बघायला मिळाले. त्यांनी बकर्‍या, शेळ्या  पाळलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची बदके त्या बरोबर Turkey हा पक्षी पण बघायला मिळाला. आता पर्यंत मोराला पिसारा फुलवताना बघितला होता, पण Turkey हा पक्षी पण पिसारा फुलवतो हे पहिल्यांदा बघितले. Turkey सुद्धा मोरा सारखाच  कर्कश ओरडतो. ही एक निसर्गाची वेगळी अशी विसंगती. दोन्ही पक्षी दिसायला सुंदर पण आवाज मात्र कर्कश.



Cattle ना जो चारा दिला जातो तो म्हणजे मक्याची सुकलेली झाडे किंवा चारा ते शेतात पिकवतात.  सुकलेली झाडे फेकून देण्या पेक्षा शेळ्यांना खायला देवून त्याचा उपयोग केला जातो.

शेतातून शुद्ध अशा हवेत फिरताना मजा येत होती. खूप दिवसा पासून इच्छा होती शेतात बसून कांदा-भाकरीच गावरान जेवण जेवावं. म्हणून दुपारचे जेवण आम्ही शेतात बसून घेतले. जेवण नेहमीचंच पण त्या दिवशी त्या जेवणाची चव काय वेगळीच होती.

एक समाधान मिळाले की मुले अभ्यास करताना ज्या सगळ्या गोष्टी शिकत आहेत त्या थोड्या प्रमाणात  का होईना मी त्यांना प्रत्यक्ष दाखवू शकले. पुस्तकी माहिती पेक्षा प्रत्यक्ष बघितलेल्या गोष्टी जास्त चांगल्या लक्षात राहतात ह्याच्यावर माझा विश्वास आहे.











सौ. श्रुति हजरनीस