जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
कृपा करी सार्यांवरी मिटो हेवा दावा ||धृ.||
कार्यारंभी वंदितात सारे श्री गणेशा
मंगलमूर्ती मोरयाची आम्हा अभिलाषा II १ II
...... ||धृ.||
घरोघरी झांज आरती होतो शंखनाद
अथर्वाच्या जयघोषाचा जणू तो निनाद
...... ||धृ.||
गणपतीच्या स्तवनाची होती किती पठणे
हेरंबाच्या वरदाने फुलती सारी मने
...... ||धृ.||
मंडपात मंडळाच्या रोषणाई न्यारी
गजवक्रासंगे ढोल प्रमुदित सारी
...... ||धृ.||
उच्चनीच वर्णभेद सारे विसरती
गणराज सस्वरूपी रंगुनी डोलती
..... ||धृ.||
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
चिंता क्लेश दुःख सारे दूर तुम्ही ठेवा
..... ||धृ.||
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
ज्ञान बुद्धीची प्रज्योत तेवतीच ठेवा
..... ||धृ.||
-अर्चना देशमुख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा