साहित्य : १ वाटी रवा , १/२ वाटी ओट्स, ताक किवा दही, फोडणी चे साहित्य, किसलेले गाजर , वाफवलेले मका दाणे , किसलेले ,आले कढीपत्ता
चणाडाळ १ च. , उडीद डाळ १ च. , इनो १ च
कृती : प्रथम एका कढईत तेल तापवून त्यात मोहोरीची हिंग घालून फोडणी करणे.
त्यात आधी चणाडाळ घालणे थोडा रंग बदलला कि मग उडीदडाळ घालणे
नंतर त्यात कढीपत्ता आणि आले घालून मग त्यात रवा आणि ओट्स घालणे
नीट परतून घेणे. रवा नीट भाजला गेला पाहिजे
दुसरया पातेल्यात दह्याचे ताक करून किवा तयार ताक घेणे त्यात वरील गार झालेला रवा घालणे
अंदाजे अर्धा तास भिजवणे....रवा छान फुलून आला पाहिजे.
एकी कडे कुकर मध्ये पाणी उकळत ठेऊन दुसरीकडे इडली पात्र तयार करणे
वरील रव्याच्या मिश्रणात इनो घालून पुन्हा ५ मिनटे ठेवणे.
नंतर इडली पात्रात आधी गाजर आणि मक्याचे दाणेघालून त्यावर वरील मिश्रण घालणे
इडल्या नेहमी प्रमाणे वाफून घेणे.
मृण्मयी आठलेकर
yummyyyy ...... mast innovative idea ....
उत्तर द्याहटवाआवडली कृती..करून बघते...
उत्तर द्याहटवा