आपण अनेक वेळा विमान प्रवास करतो. ते इतकं सवयीचं आहे की आपण विमानात जातो, सामान ठेवतो आणि ठराविक सूचना सुरु होतात. त्यामधे आपल्याशी पायलट पण बोलतो. तो आपलं नाव सांगतो. कुठून जाणार, किती ऊंची वरुन जाणार, अंदाजे लागणारा वेळ... सगळं सविस्तर सांगतो. आपल्या सगळ्यांना सुखरुप पोहोचवायची जबाबदारी त्या पायलटची असते. ह्या सगळ्याकडे आपलं किती लक्ष असतं ? पण मंडळी, विचार करा, जर एका विमान प्रवासात आपल्याला ऐकू आलं की –This is Captain Aditya Patwardhan , Pilot in Command for this Flight AI xxx flying from……. तर एकदम कान टवकारुन ऐकाल ना. हो.......हे अगदी खरंय. श्री चंद्रशेखर पटवर्धन आणि सौ. उमा पटवर्धन यांचा मुलगा आदित्य पटवर्धन याने Commercial Pilot चे प्रशिक्षण घेतले आहे. एक वेगळं करियर, त्याचे वेगळे अनुभव आदित्य कडून ऐकायला मिळाले.
आदित्यने 12 वी नंतर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. मोठा भाऊ, आई घरचा मोठा व्यवसाय सांभाळतात तर ओघाने आदित्य पण ह्यात येणार हे साधारण मनाशी ठरलेले असते. पण ह्या काळात आदित्य पुण्याजवळ हडपसर येथे Gliding Center ला गेला. तिथे त्याने पहिले Training घेतले. तिथे त्याची प्रगती पाहता त्याला Commercial Pilot साठी काय काय करावे लागेल ह्याचे Training देण्यात आले. त्यानंतर आदित्यचा कल Commercial Pilot होण्या कडे वळला. त्याच दरम्यान त्याचा एक मित्र Commercial Pilot चे प्रशिक्षण घेत होता. त्याच्या कडून आदित्य ने सर्व माहिती मिळवली. हे जेव्हा आई-बाबांना सांगितले तेव्हा बाबा एकदम खुश झाले. आदित्य काहितरी वेगळं करतोय ह्याचा त्यांना खूप आनंद झाला. आईला मात्र आपलं पिल्लू दूर जाणार हा विरह, Commercial Pilot म्हणजे जरा काळजी..... पण काहीतरी वेगळं करतोय ह्याचा खूप आनंद अशा संमिश्र भावना होत्या. पण मनापासून आई-बाबा-भाऊ (चिन्मय) ह्यांनी प्रोत्साहन दिले.
आदित्य ने ऑस्ट्रेलिया येथे हे प्रशिक्षण घ्यायचा निर्णय घेतला. त्यासाठीची शैक्षणिक पात्रता (12 th Std with Maths and Physics ) त्याने आधीच पूर्ण केली होती. Physical fitness आणि अजून काही परीक्षा देऊन् आदित्यने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. Commercial Pilot चा course 12 महिन्यांचा असतो. पण हे केवळ हवामानावर अवलंबून असते. जर हवामान खराब असेल तर जास्त दिवस लागतात. हे जरा नवीन वाटले पण विचार करता पटले. कॉलेज मधे सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे सगळं स्वत:चं स्वत: शिकायचे असे अपेक्षित होते. 2 -3 आठवडे अभ्यास करायचा आणि त्याची परिक्षा द्यायची. 12 वी पर्यंतच्या भारतीय अभ्यासक्रमानंतर हे कठीण होते पण आदित्य ने अतिशय उत्तम प्रकारे पार पाडले. College चे routine खूप hectic असते. रोज सकाळी लवकर (5 वाजता) उठून स्वत:चा व्यायाम (Physical Fitness पण स्वत:चा स्वत:च ठेवणे अपेक्षित होते) करुन, विमानाची सगळी तपासणी करायची. त्यात विमान साफ करणे हे पण स्वत:लाच करावे लागते. All OK झालं की मग Instructor ची वाट पहायची. तो आला की मग त्याने OK म्हटलं की मग त्याच्या मार्गदर्शना खाली Flight घ्यायची. College सुरु झाल्यापासून साधारण एका आठवड्यात विमान चालवायला मिळते. आदित्य अतिशय उत्साहाने सागत होता की "पहिली फ्लाइट घेतली तेव्हा खूप thrilling वाटलं." ह्या सगळ्या Visual Flights असतात.म्हणजे विमान जास्तीत जास्त 10000 फूट उंची वरुन उडते. त्या शिकाऊ विमानात सगळं Manual handling असतं. म्हणजे विमान उडवताना खाली जमीन, शेत, नद्या, रस्ते सगळं व्यवस्थित दिसतं आणि ते पाहूनच आपण विमान चालवायचं. Radar monitoring etc Automation नसतं. ह्यात वेगळंच Thrill असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा exam असते तेव्हा काय चूक, काय बरोबर हे सांगितले जाते आणि जे चूक असेल ते सुधारण्यासाठी सांगितले जाते. थोडक्यात 100% marks मिळवावे लागतात तेव्हाच पास असं Declare केलं जातं.
"ह्या सर्व course मधे तुला Thrilling अनुभव काय आले? " असे विचारता आदित्य ने दोन खूप वेगळेच अनुभव सांगितले ते असे.....
एकदा विमानात बसलो आणि साधारण 5000 फूट उंच गेलो असता मला एकदम वारा आला असे वाटले. शेजारी बसलेल्या माझ्या Instructor ने मला मागे वळून पहा असा इशारा केला. पहातो तर विमानाचे दार उघडले होते. एक क्षण प्रचंड भीती वाटली पण नंतर हळुच उठून दार लावले आणि Flight continue केली.
असेंच अजून एकदा Fly करत असताना कळले की विमानातील दिशा दाखवणारे यंत्र निकामी झाले आहे. आपण कुठे जातोय हेच कळत नव्हते. त्या वेळी Instructor पण बरोबर नव्हता. बर्याच वेळाने एका लहान Private धावपट्रटीवर विमान उतरवले. तेथील लोक अतिशय साशंक नजरेने पहात होते. त्या लोकाना सांगितले कि मी चुकलो आहे तर त्या लोकांनी खूप चांगली मदत केली. मग Control room शी संपर्क साधून परत आलो. आल्यावर भिती वाटत होती की Instructor नक्की रागावणार.... warning देणार ! पण ह्यातले काहीच झाले नाही. आश्चर्य म्हणजे खूप स्तुती केली गेली.
ह्या अनुभवावरुन असे लक्षात आले की नुसते विमान चालवायला शिकवणे हे महत्वाचे नाही तर How to React In case of Emergency , keep patience , safety regulation etc is also a part of Training and is very very important in future .
तर असा हा धडाडीचा आदित्य आता भारतीय License मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा !!
स्मिता काळे
Like father like son.
उत्तर द्याहटवाVenturing always for something new.
Aditya all the best for the license.
Smita appreciate your efforts.
ALL D BEST ADITYA!....RAKHEE
उत्तर द्याहटवा