गुरुवार, ७ एप्रिल, २०११

पायलट - एक वेगळं करियर

आपण अनेक वेळा विमान प्रवास करतो. ते इतकं सवयीचं आहे की आपण विमानात जातो, सामान ठेवतो आणि ठराविक सूचना सुरु होतात. त्यामधे आपल्याशी पायलट पण बोलतो. तो आपलं नाव सांगतो. कुठून जाणारकिती ऊंची वरुन जाणार, अंदाजे लागणारा वेळ... सगळं सविस्तर सांगतो. आपल्या सगळ्यांना सुखरुप पोहोचवायची जबाबदारी त्या पायलटची असते. ह्या सगळ्याकडे आपलं किती लक्ष असतं पण मंडळी, विचार करा, जर एका विमान प्रवासात आपल्याला ऐकू आलं की –This is Captain Aditya Patwardhan , Pilot in Command  for this Flight AI xxx flying from……. तर एकदम कान टवकारुन ऐकाल ना. हो.......हे अगदी खरंय. श्री चंद्रशेखर पटवर्धन आणि सौ. उमा पटवर्धन यांचा मुलगा आदित्य पटवर्धन याने Commercial Pilot चे प्रशिक्षण घेतले आहे. एक वेगळं करियर, त्याचे वेगळे अनुभव आदित्य कडून ऐकायला मिळाले.



आदित्यने 12 वी नंतर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. मोठा भाऊआई घरचा मोठा व्यवसाय सांभाळतात तर ओघाने आदित्य पण ह्यात येणार हे साधारण मनाशी ठरलेले असते. पण ह्या काळात आदित्य पुण्याजवळ हडपसर येथे Gliding Center ला गेला. तिथे त्याने पहिले Training घेतले. तिथे त्याची प्रगती पाहता त्याला Commercial Pilot साठी काय काय करावे लागेल ह्याचे  Training देण्यात आले. त्यानंतर आदित्यचा कल Commercial Pilot होण्या कडे वळला. त्याच दरम्यान त्याचा एक मित्र Commercial Pilot चे प्रशिक्षण घेत होता. त्याच्या कडून आदित्य ने सर्व माहिती मिळवली. हे जेव्हा आई-बाबांना सांगितले तेव्हा बाबा एकदम खुश झाले. आदित्य  काहितरी वेगळं करतोय ह्याचा त्यांना खूप आनंद झाला. आईला मात्र आपलं पिल्लू दूर जाणार हा विरह,  Commercial Pilot  म्हणजे जरा काळजी..... पण   काहीतरी वेगळं करतोय ह्याचा खूप आनंद अशा संमिश्र भावना होत्या.  पण मनापासून आई-बाबा-भाऊ (चिन्मय) ह्यांनी प्रोत्साहन दिले.
 
आदित्य ने ऑस्ट्रेलिया येथे हे प्रशिक्षण  घ्यायचा निर्णय घेतला. त्यासाठीची शैक्षणिक पात्रता (12 th Std with Maths and Physics ) त्याने आधीच पूर्ण केली  होती. Physical fitness आणि अजून काही परीक्षा देऊन् आदित्यने  प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.  Commercial Pilot चा course 12 महिन्यांचा असतो. पण हे केवळ हवामानावर अवलंबून असते. जर हवामान खराब असेल तर जास्त दिवस  लागतात. हे जरा नवीन वाटले पण विचार करता पटले.  कॉलेज मधे सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे सगळं स्वत:चं स्वत: शिकायचे असे अपेक्षित होते.  2 -3 आठवडे अभ्यास करायचा  आणि त्याची परिक्षा द्यायची.   12 वी पर्यंतच्या भारतीय अभ्यासक्रमानंतर हे कठीण होते पण आदित्य ने अतिशय  उत्तम प्रकारे  पार पाडले.   College चे routine खूhectic  असते. रोज सकाळी लवकर (5 वाजता) उठून स्वत:चा व्यायाम (Physical Fitness  पण स्वत:चा स्वत:च ठेवणे अपेक्षित होते) करुनविमानाची सगळी तपासणी करायची. त्यात विमान साफ करणे हे पण स्वत:लाच करावे लागते. All OK झालं की मग Instructor  ची वाट पहायची. तो आला की मग त्याने OK म्हटलं की मग त्याच्या  मार्गदर्शना खाली Flight घ्यायची.   College  सुरु झाल्यापासून साधारण एका आठवड्यात विमान चालवायला मिळते.  आदित्य अतिशय उत्साहाने सागत होता की "पहिली  फ्लाइट घेतली तेव्हा खूप thrilling वाटलं." ह्या सगळ्या  Visual Flights असतात.म्हणजे विमान जास्तीत जास्त 10000 फूट उंची वरुन उडते. त्या शिकाऊ विमानात सगळं Manual handling  असतं. म्हणजे विमान उडवताना  खाली जमीनशेत, नद्यारस्ते सगळं  व्यवस्थित दिसतं आणि ते पाहूनच आपण विमान चालवायचं. Radar monitoring etc Automation नसतं. ह्यात वेगळंच Thrill असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा exam असते तेव्हा काय चूक, काय बरोबर हे सांगितले जाते आणि जे चूक असेल ते सुधारण्यासाठी  सांगितले जाते. थोडक्यात  100% marks मिळवावे  लागतात तेव्हाच  पास असं Declare  केलं जातं.

 
 
"ह्या सर्व course मधे तुला  Thrilling  अनुभव काय आले?  " असे  विचारता  आदित्य ने  दोन खूप वेगळेच अनुभव  सांगितले ते असे.....

एकदा  विमानात बसलो आणि साधारण 5000  फूट उंच गेलो  असता मला एकदम  वारा  आला असे वाटले. शेजारी  बसलेल्या  माझ्या Instructor  ने मला  मागे वळून पहा असा इशारा केला. पहातो तर  विमानाचे दार  उघडले  होते.  एक क्षण प्रचंड  भीती वाटली  पण नंतर  हळुच  उठून  दार  लावले आणि Flight continue केली.

असेंच  अजून एकदा Fly  करत  असताना कळले की विमानातील  दिशा  दाखवणारे  यंत्र  निकामी  झाले  आहे.  आपण कुठे  जातोय हेच  कळत नव्हते. त्या वेळी Instructor पण बरोबर नव्हता. बर्‍याच वेळाने एका  लहान Private  धावपट्रटीवर  विमान उतरवले. तेथील लोक अतिशय  साशंक  नजरेने पहात होते.   त्या लोकाना सांगितले कि  मी चुकलो आहे तर त्या लोकांनी खूप चांगली मदत केली.  मग Control  room शी संपर्क साधून परत आलो.  आल्यावर भिती  वाटत  होती की Instructor नक्की  रागावणार.... warning  देणार ! पण ह्यातले  काहीच झाले नाही.  आश्चर्य म्हणजे खूप स्तुती केली गेली.
  
ह्या अनुभवावरुन  असे लक्षात आले की नुसते विमान चालवायला शिकवणे हे महत्वाचे  नाही तर How to React In case of Emergency , keep patience , safety regulation etc is also a part of Training and is very very important in future . 


 
तर  असा  हा धडाडीचा आदित्य आता भारतीय  License मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.  त्याला खूप खूप शुभेच्छा !!














स्मिता काळे

रविवार, ३ एप्रिल, २०११

मी काढलेली चित्रं




















































































































































सोनाली राणे

स्वप्नपूर्ती विश्वचषकाची



आपल्या सचिनचं स्वप्नं पूर्ण झालं.  १२१ कोटी भारतीयांची मनं जिंकली भारताच्या क्रिकेट टीमनं !! ११ जणांची टीम वानखेडे स्टेडीयम वर खेळत होती पण अख्खी भारतीय जनता त्यांच्यासोबत खेळत होती.  मॅच बघतांनाही तेच स्पिरीट होतं.  आम्ही कुवेतमधे असून सुद्धा त्याच उत्साहात, त्याच जल्लोषात भारताचा विजय साजरा केला.
मॅचची सुरवात झाली तेव्हापासून जवळजवळ ४५ ओव्हर्स होईस्तोवर मॅच आपल्या ताब्यात होती.  पण शेवटचे पाच ओव्हर्स झाल्यानंतर मात्र मनात शंकेची पाल चुकचुकायला सुरवात झाली.  मधला Interval खूपशा अस्वस्थतेतच गेला.  मग आपली बॅटींग ! दुसर्‍याच बॉलवर गेलेली सेहवागची विकेट……लंकेचा जल्लोष…..आई गं…..!! नकारात्मक विचार अजिबातच मनात येऊ द्यायचे नाही असं ठरवलं होतं.   मग आपल्या सचिनची विकेट..झालं……. !! आता मात्र  धीर सुटत चालला.  पण आपल्या फलंदाजांवरचा विश्वासही बळकट होता.  मग विराट…..गंभीर आणि धोनी……!! धोनीचं जबरदस्त आत्मविश्वासाने ग्राऊंडवर येणं बरंच काही सांगत होतं.  दुसर्‍या बाजूने गंभीरही खंबीर होता.  पहिल्यापासून शेवटपर्यंत रनरेट अगदी maintained होता.
मॅच एकेक ओव्हर पुढे सरकत होती.  श्वास काही केल्या नॉर्मल वर येत नव्हता.  धडधड इतकी वाढली होती की ती चक्क स्वत:ला ऐकूही येत होती.  पण धोनी आणि गंभीर मात्र अगदी शांतपणे खेळत होते.  कशाचीच पर्वा न करता त्यांची वाटचाल सुरु होती.  धोनीच्या चेहेर्‍यावर मात्र थकवा जाणवत होता.  मधेच त्याला क्रॅम्प पण आली पाठीत.  सगळ्यांचे चेहेरे विचारमग्न होते.  पण तो जिद्दीने उठला.  गंभीरची शतकाकडे वाटचाल सुरुच होती.  आता फक्त ३ धावा..! त्याला धीर धरवेना…….समोर येऊन फटका मारायला गेला पण त्या अगदीच सुमार चेंडूने त्याला चकवलं आणि विश्वकप मधलं त्याचं पहिलं शतक हुकलं !! सगळे लोक हळहळले !! क्रिकेट…….एक क्रूर खेळ !!
मग आला युवी !! जबरदस्त फ़ॉर्म पुन्हा मिळवलेला युवी आणि Super Cool कॅप्टन धोनी !! विजयाच्या उंबरठ्याशी आणलं भारताला…..!! आणि मग तो स्टायलिश षट्‌कार…………!! केवळ अप्रतिम !!  त्या एका षटकारानं २८ वर्षांनी पुन्हा भारतानं विश्वचषक जिंकला !!  संगकारा आणि लंकेच्या खेळाडूंचे हताश चेहरे बघवत नव्हते.  ते पण जबरदस्त खेळले होते पण विजयाची माळ मात्र भारताच्या गळ्यात पडली होती.
आपण जिंकलो……. जिंकलो????? येस…………जिंकलो….याहूऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ !!
आणि मग जो काय जल्लोष सुरु झाला तो शब्दातीत होता !! सचिनला, गॅरी कर्स्टनला खांद्यावरुन मिरवणं, युवीचं सचिनला घट्ट मिठी मारुन रडणं, भज्जीचं भावनाप्रधान होणं…सगळं सगळं प्रत्येक भारतीय अनिमिष नजरेनं साठवून घेत होता.  त्यानंतरच्या प्रत्येकाच्या मुलाखती !! ते सचिनच्या स्वप्नाचं पूर्ण होणं…… सगळंच स्वप्नवत्‌ होतं.
भारतात तर जल्लोष होताच. पण इथे कुवेतमधेही सगळे रस्त्यावर आले………नाचले, फटाके उडवले……!! एकमेकांना फोनवरुन अभिनंदनाचा वर्षाव !! सगळं वातावरण अगदी भारलेलं !! सचिनचा आनंद तर ओसंडून वाहत होता.  तो क्षण संपूच नये असं वाटत होतं !  अजून काही दिवस हा भर असाच राहणार !! खेळाडूंवर बक्षिसांची खैरात करण्यात आली.  No doubt, They deserve it !!
महेंद्र सिंग धोनी….. भारताचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन !! T-20 चं विजेतेपद, कसोटीतलं पहिलं मानांकन,  आता हा विश्वचषक आणि त्याबरोबरच One Day मधलंही पहिलं मानांकन……. !! अवघं क्रिकेट विश्व त्याने आणि त्याच्या टीमने आपल्या पायाशी झुकवलं !!  एक कडक सॅल्यूट धोनी आणि त्याच्या वीरांना !!
भारतीय टीमला या दणदणीत  विजयासाठी मनापासून शुभेच्छा !!
एक मात्र नक्की जाणवलं !! भारतातले विविध धर्मी लोक सगळा भेदभाव विसरुन क्रिकेटसाठी मात्र एकरुप होतात !! हा खरं तर क्रिकेट ह्या खेळाचा विजय आहे !!
Three Cheers for Indian Cricket Team……Hip Hip Hurray……Hip Hip Hurray……. Hip Hip Hurray………..!!












जयश्री अंबासकर

शनिवार, २ एप्रिल, २०११