गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

गार्‍हाणे

Lift मधून बाहेर येताच
आला खरपूस खमंग वास
स्वप्नात आहे मी की
हा जागेपणीचा भास ?

बेल वाजवली उघडे दार
कळले हा नव्हता परीहास
परीटघडीच्या कपड्यात भार्या
सुसज्ज होती स्वागतास

सुहास्यवदने वदली नाथा
आज कामाचा झाला का फार त्रास
असल्या सुखस्वप्नांचे मोहक चित्र
केव्हाच तर गेले होते लयास

गेल्या कित्येक दिवसात, वर्षात
माझी मुळी ठेवली नव्हती पत्रास
वाटले परतून आला खचितच
विवाहानंतरचा तो धुंद मधुमास

ज्ञात झाले मंडळाने महिलांसाठी
स्पर्धा योजिली आहे खास
"मी सुगरण’ बनण्याचा
भार्येने घेतला आहे ध्यास

रोज नव्या डिशेसची टेबलावर
रचू लागली भली मोठी रास
शेजारी, पाजारी, मित्र मंडळी
सार्‍यांचेच भाग्य आले उदयास

बच्चे कंपनीचा आनंदही अगदी
पोचला जाऊन थेट गगनास
कारण रसनेसोबतच सजावटीची
व्हायची रोज नवनवी आरास

पण हाय..... दिवस उगवला "Family Day" चा
बक्षिसाची मावळली आशा अन्‌ भोपळा फुटला भ्रमाचा
भार्येच्या दिवास्वप्नांचा पुरता झाला र्‍हास
चूल झाली बंद आता रोज आम्हाला उपवास
आता रोजच आम्हाला उपवास












अर्चना देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा