शनिवार, ३ सप्टेंबर, २०११

वाळवंटातलं फार्म हाऊस



FARM HOUSE म्हटलं की डोळ्या समोर येतं ते लांबच लांब हिरवगार शेत, टुमदार घर, मोकळी अशी जागा आणि शुद्ध हवा. अस एखादं FARM HOUSE बघायला भारतात मिळणं हे काय नवीन नाही.  पण हे मी असं म्हटलं की कुवेत ला सुद्धा बघायला मिळालं तर ते एखादं आश्चर्य वाटावं इतपत अशक्य वाटतं. कुवेत म्हणजे वाळवंट हे इतकं डोक्यात पक्क बसलंय की असं काही कुवेत ला बघायला मिळेल असं कधी वाटलंच नाही.

FARM HOUSE  आम्हाला  बघायला मिळालं ते आमचा मित्र राहुल गोखले मुळे. राहुलच्या मित्राचं कुवेतला farm house आहे. ते बघायची आम्हांला संधी मिळाली. १०० acre ची जागा पण काम करायला फक्त तिकडे १२ माणसे आहेत.  वाळवंटाच्या जमिनीत एकाच ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पिके वाढवली  आहेत. तिकडे आम्हांला वांगी, भोपळा, दुधी भोपळा, कोबी, cauliflower, पालक, मुळा, बटाटा अशी बर्‍याच प्रकारची फळझाडे, हिरव्या पाले भाज्या बघायला मिळाल्या.
        




















दुधी भोपळा एवढा मोठा आणि वजनदार की जणू  भीमाच्या गदेला शोभेल असा होता; तो दोन  हातानी उचलायला लागला. 



पालक पण जमिनी पासून एक फूट वरती उगवलेला
 .  वांग्याचं फुल वांगी रंगाचं खूप मोहक होतं. एका कोबीच्या झाडाला चार-चार मोठे कोबी एकदम लागले होते; कोबीचा आकार एवढा मोठा की 'मोठा'  हा शब्द पण कमी वाटत होतां. खरंतर भव्यच.

सहा फूट उंच सूर्यफुलाची झाडे एवढी कडक आणि सरळ होती की वाकवायचा  प्रयत्न केला तरी ती वाकली गेली नाहीत. फुले पण सूर्यासारखीच  भव्य  होती.



        

सगळ्या भाजीत आवडती भाजी  बटाटा   - जमिनीत  प्रत्यक्ष बघताना मजा वाटली .  मक्या ची झाडे पण तितकीच छान. शेतातल्या कोवळ्या मक्याची चव तर काय अफलातून.
"चल रे  भोपळ्या टुणूक टुणूक" असे म्हणणार्‍या आजीची गोष्ट आठवली तो  महाकाय असा लाल  भोपळा बघून. ती तेव्हा ही खरी वाटली होती आणि परत एकदा आता सुद्धा  विश्वास ठेवावासा वाटला.  हिरवे कच्चे  tomato बघून कच्च्या tomatochi  भाजी किती छान होईल हा विचार मनात आल्या वाचून  राहिला नाही.



तिकडे cattle farming, fish farming सुद्धा बघायला मिळाले. त्यांनी बकर्‍या, शेळ्या  पाळलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची बदके त्या बरोबर Turkey हा पक्षी पण बघायला मिळाला. आता पर्यंत मोराला पिसारा फुलवताना बघितला होता, पण Turkey हा पक्षी पण पिसारा फुलवतो हे पहिल्यांदा बघितले. Turkey सुद्धा मोरा सारखाच  कर्कश ओरडतो. ही एक निसर्गाची वेगळी अशी विसंगती. दोन्ही पक्षी दिसायला सुंदर पण आवाज मात्र कर्कश.



Cattle ना जो चारा दिला जातो तो म्हणजे मक्याची सुकलेली झाडे किंवा चारा ते शेतात पिकवतात.  सुकलेली झाडे फेकून देण्या पेक्षा शेळ्यांना खायला देवून त्याचा उपयोग केला जातो.

शेतातून शुद्ध अशा हवेत फिरताना मजा येत होती. खूप दिवसा पासून इच्छा होती शेतात बसून कांदा-भाकरीच गावरान जेवण जेवावं. म्हणून दुपारचे जेवण आम्ही शेतात बसून घेतले. जेवण नेहमीचंच पण त्या दिवशी त्या जेवणाची चव काय वेगळीच होती.

एक समाधान मिळाले की मुले अभ्यास करताना ज्या सगळ्या गोष्टी शिकत आहेत त्या थोड्या प्रमाणात  का होईना मी त्यांना प्रत्यक्ष दाखवू शकले. पुस्तकी माहिती पेक्षा प्रत्यक्ष बघितलेल्या गोष्टी जास्त चांगल्या लक्षात राहतात ह्याच्यावर माझा विश्वास आहे.











सौ. श्रुति हजरनीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा