मंगळवार, ८ मार्च, २०११

“कैफियत” कुवेतमधील समस्त पुरुषवर्गाची


(निमित्त महिलादिनाचे)

चाकरमानी सारे आम्ही
उठावंच लागतं आम्हाला
अगदी भल्याऽऽऽ पहाटे
न फोडता कोणतेही फाटे

नवनव्या स्वप्नात मग्न असते
सौभाग्यवतीची रम्य पहाट
चहाचं आधण गॅसवर चढवत
हलकेच घालतो तिला मी साद

उशीरच झाला अंमळ थोडा
टिफीनचा कसा आता साधावा मेळ
कॅंटिनवरच भागवाल का आज
कशीबशी मारुन न्या ही वेळ

कामाच्या कटकटींनी दिवसभर
डोकं जातं अगदी उठून
किटी पार्टीचा कैफ सौ चा
उतरलेला नसतो अजून

चक्रधारी बनून जावेच लागते
गिफ्ट आणायला, ट्युशनला सोडायला
वेळच नाही मिळत कधी
शांत, निवांत टिव्ही पहायला

महिलावर्गासाठी येथे
रोजच दसरा नि दिवाळी
संसाराच्या ओझ्याची
शिक्षा मात्र आमच्याच भाळी
  
पिकनिक, आऊटींग नसले तरीही
विकेंडला लटकते किचन बंद ची पाटी
पेंडींग कामांची सोपवली जाते
हाती आमच्या भली मोठी यादी

वाढदिवस कधी सौ चा, तर कधी लग्नाचा
पार्टीसाठी कधी हिल्टन, तर कधी रॅडीसन सास
पुरणपोळीच्या खमंग वासाचा मात्र
अपुराच राहतो घेतलेला ध्यास

2 “B” (बॉस आणि बायको) चा
कायम ओढवून घेतो रोष
कसाला यांच्या उतरतांना
कंठाला पडतो शोष

गरजच काय कुवेतमधे
साजरा करण्याची महिला दिन
हवालदिल पुरुष बिचारे
झाले आहे दुर्बल दीन












अर्चना देशमुख

1 टिप्पणी:

  1. Like the gist of poem.
    By the way thanks to remember men and their sacrifices, that too on "जागतिक महिला दिन"
    Great.

    उत्तर द्याहटवा