सोमवार, ७ मार्च, २०११

स्त्री ची रुपं


स्त्री  तुझी  रूपं  गं किती ,
जन्म  देणारी  आई, बोट  धरून  रस्ता  दाखवणारी  माली,
कधी  होतेस  तू  कडेवर  घेवून  गल्लीत  फिरणारी, लाड  करणारी, खेळवणारी  बहीण  ती  ताई,
कधी  असतेस तू हक्काने  भाऊ  बीज  मागणारी  चिमी, छोटी  सई,
कधी  असतेस  तू  तारुण्याच्या  सळसळत्या  रक्ताला वर  आणि उचित वावर  देणारी  मैत्रीण,   
हातात  हात  देत  वाटेवर  सदैव  सोबत  असणारी  सखी
रुसव्या  फुगव्याचा  श्रावण  देत  स्वप्नांना  पंख  देणारी  पत्नी  
पतीच्या  स्वप्नांसाठी  सर्वस्व  अर्पण  करणारी  ती  स्वामिनी
सुख  दुखात  साथ  देणारी  ती  सहचारी
तुझे  बीज  अंकुरणारी, तुझ्या  सारखेच  रुपडे, तुझे  बालपण अनुभवायला
देणारी  तुझ्या  छ्कुल्यांची आई
अन्यायावर  सळसळून  उठणारी  ती  अंबिका, ती असुर  मर्दिनी
आयुष्याच्या संध्या  छायेत  तुझी  सुश्रुषा  करणारी  तुझी  अर्धांगिनी ,
ती तुझी सौभाग्याकांक्षिणी
स्त्री तुझी रूपं गं किती, रूपं गं किती !








स्वाती राजीव कुलकर्णी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा