सोमवार, १४ फेब्रुवारी, २०११

मी पाहिलेले मस्कत आणि सलाला


आखातीदेशामध्ये निळा समुद्र व नारळाची झाडे आहेत असे कोणी सांगितले तर विश्वास बसेल...! असेच काही सलाला बद्दल वाचनात आले आणि हिवाळ्याच्या सुट्टीत सलाला आणि मस्कतला फिरायला जायचे आम्ही ठरवले. प्रथम विचार केला बघूयाच की असे खरेच आहे का? अधिक माहिती मिळवली तर मात्र पक्के कळले ओमान खूपच सुंदर देश आहे. 

सलालाला पोचलो तेव्हा मध्यरात्र झाली होती. तरी "beautification" काय असते ते दिसत होते. विमानतळ ते हॉटेल साधारण बारा किलोमीटर अंतरात सलाला खूप सुंदर आहे याची खात्री पटली. नागमोडी रस्ते, दुतर्फा उंच उंच नारळाची , केळ्याची , पपायाची  झाडे, आम्हाला तर केरळची आठवण झाली.  


both Viewes from Mughsayl Beach 

तिथला समुद्र मनाला भावला. सुंदर बीच, निळे स्वच्छ पाणी. 


@ Mughsayl Beach, Salala. Blowholes site. The blowholes are actually air holes on the floor which cut through rock to the bottom, where the sea hits land.

समुद्राच्या लाटेचं पाणी जोरात किनार्‍यावर आपटून  हवेच्या जोरामुळे जमिनीतल्या भोकांतून ५० फूट उंच  कारंज्यासारखे बाहेर पडते ते बघून आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही. Anti-gravitation  जागा हे एक वेगळे आश्चर्य. गाडी चढावर neutral मध्ये असताना पुढे जात होती हा अनुभव काही वेगळाच होता. झरे, पक्षी, डोंगर सगळे काही छान. हे बघताना आपण
आखातात आहोत हे जराही जाणवत नाही.
 

जिथे बघावे ते सुंदर, फोटोजेनिक, मीरबतला जाताना रस्ते हे "चुनखडीच्या" डोंगरातून, 


Such views are often seen while driving in / out / nearby

त्यातून उतरताना समोर दिसतो तो निळाशार समुद्र, बाजूला दर्या व गर्द वनराई. नागमोडी वळणाचे रस्ते व रस्त्याच्या बाजूला नारळाची बाग व नारळपाण्याची टपरी 

बघायला खूप आकर्षक वाटले. सुंदरता ही कुठल्या ही गोष्टीत असू शकते ह्याची प्रचिती रस्ते बघताना येत होत. 

सलाला ला फिरताना 4wd जीप असायलाच हवी. खोर-रोरी ला जाताना खडकाळ रस्त्या वरून उतरताना जीप मधून जाताना जो काही अनुभव आला तो चित्तथरारक होता. 


गोडे पाणी समुद्राला मिळण्याचे ठिकाण असल्यामुळे एकाच ठिकाणी भरपूर प्रकारचे पक्षी (migrant birds) तिथे बघितले.

सलाला नंतर आम्ही मस्कत ला गेलो. मस्कत हे शहर म्हणजे स्वता, आखीव-रेखीव शहराचा उत्तम नमुना.  डोंगरा मध्ये बसवलेले शहर म्हणजे मस्कत. ओमानवासियांना कुठेही डोंगर भुई सपाट करून तिथे उंच-उंच इमारती बांधायची गरज वाटली नाही. सुंदरता ठेवून शहरीकरणाचं उत्तम उदाहरण म्हणजे मस्कत. 

मस्कत ला गेलो तेव्हा सोमवारचा दिवस होता. म्हणून मस्कत बघायला सुरुवात केली ते शंकराच्या देवळापासून. सुबक असे शंकराचे देऊळ बघून मन भरून आलं.  त्याच्या नंतर कृष्ण, गणपती ह्यांचे एकत्र मंदिर बघितले. खूपच  सुंदर, अप्रतिम. ह्या दोन्ही देवळांना भेटी दिल्या नंतर एक वेगळी शांतता मनामध्ये भरून राहिली. इथे एक अनुभव सांगावासा वाटतो की देवळाचा रस्ता शोधत असताना, एक-दोन ओमानी भेटले. त्यांच्याशी english  मध्ये बोललो तेव्हा त्यांनी सांगितले आमच्याशी हिंदी मध्ये बोला हे ऐकून च धक्का बसला. India फिरताना जिथे हिंदीतून बोलल्यावर ही कुठली भाषा आहे असे लोकांच्या चेहऱ्यावर भाव बघितले आहेत... अनपेक्षित होतं ते अस्सल हिंदीतून संभाषण. 

निझवा, १००० mountains, अल-हुटा cave  केवळ अप्रतिम. मस्कत ला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे Sultan Qaboos Grand Mosque. नावा प्रमाणे Grand Mosque. 

ही जगातील तिसरी मोठी Mosque आहे. 
The world's Second largest chandelier

Mosque ला पर्शिअन पद्धतीचे कोरीव काम केलेले आहे. "लाजवाब" हा सुद्धा शब्द कमी पडेल की काय अस वाटत राहतं. तिथला कांताब बीच मोठा आणि स्वछ आहे. बोटीतून फिरायची मजा काही वेगळीच होती. 















श्रुती हजरनीस

३ टिप्पण्या:

  1. Shruti
    Nice narration. Personally I feel adding Shankar Temple's photo would have further added glitter to the depiction.

    Enjoyed reading.Amazing photographs by Bhupesh.

    उत्तर द्याहटवा
  2. Wonderful narration and excellent photography..... We had virtual Salalh tour ....

    उत्तर द्याहटवा
  3. वा.. झक्कास लिहीले आहेस.. फोटो मस्तंच.. लिखाण उत्कृष्ट.. क्या बात है... एकदा भेट देण्यासारखेच आहे हे नक्की..

    उत्तर द्याहटवा