रविवार, १३ फेब्रुवारी, २०११

खेकडा मसाला




साहित्य:
 
२-३ खेकडे
४ कांदे बारीक चिरलेले 
१ टोमॅटो
१ मोठा चमचा हळद 
१ मोठा चमचा तिखट
१ छोटा चमचा आलं लसूण पेस्ट
१ छोटा चमचा धने पूड
१ छोटा चमचा जिरे पूड
१ चमचा लाल मसाला
४ तमालपत्र (२ भाजणीकरता , २ फोडणीकरता ) 
४ दालचिनीचे तुकडे (२ भाजणीकरता, २ फोडणीकरता )
१ चमचा धने
२-३ लवंग
३ सुक्या लाल मिरच्या
३-४ लसूण पाकळ्या
४ चमचे तेल
३-४ कोकम
अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं
थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर 
मीठ चवीप्रमाणे
 
कृती :
 
१. खेकड्याचे डांगे, पोट आणि पाय (थोडे ठेचून) स्वच्छं धुवून त्याला हळद, तिखट, मीठ लावून ३-४ तास ठेवणे.  

२. भाजणी - तव्यावर 2 चमचे तेल टाकून त्यात २ तमालपत्र, २ दालचिनीचे तुकडे, लवंग, धने, लसूण पाकळ्या, सुक्या मिरच्या (देठ काढून)  टाकून परतवणे. नंतर त्यात  मूठभर बारीक चिरलेला कांदा घालून परतवणे. कांदा थोडा गुलाबी झाला की खोबरं घालून परतवणे. मंद गॅसवर सर्व परतवून घेणे. पूर्ण भाजणीचा रंग गोल्डन ब्राऊन झाला की गॅस बंद करणे. मिक्सरमध्ये सर्व भाजणी आणि १ टोमॅटो थोडं पाणी घालून वाटणे. भाजणीचे वाटण तयार.

३. भांड्यामध्ये  २ चमचे तेल टाकून त्यात २ तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे घालून फोडणी करणे. त्यात उरलेला सर्व कांदा आणि आलं,लसूण पेस्ट घालून परतवणे.

४. कांदा गुलाबी झाला की त्यात खेकडे घालून थोडं पाणी घालून त्यात धने पूड, जिरे पूड, लाल मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालणे. नीट ढवळणे.

५. झाकण ठेवून शिजवणे. खेकडे  शिजले की त्यात वाटलेली भाजणी घालून ढवळणे. कोकम घालणे आणि एक उकळी काढणे.  

६. गॅस बंद करून कोथिंबीर घालून गार्निश करणे.

७. झणझणीत खेकडा मसाला तय्यार. गरम गरम चपाती सोबत सर्व्ह करणे.


 












मुग्धा सरनाईक

४ टिप्पण्या: