सोमवार, १९ मार्च, २०१२

मेथी ढोकळा

साहित्य:
मेथी ढोकळा

इडली रवा -१/२ वाटी
बेसन- १ वाटी
बारीक चिरलेली मेथी - १/२ वाटी
ठेचलेले आले, लसूण, मिरची - २ लहान चमचे
लिंबू रस : १ चमचा
सोडा - १/४ चमचा
साखर- १- १-१/२ चमचे
मीठ - १ चमचा / चवीनुसार
तेल- २ चमचे मिश्रणासाठी, १ डाव फोडणी साठी
सजावटी साठी : कोथिंबीर, बारीक शेव (आवडत असल्यास), खीसलेले खोबरे / नारळ

कृती:

इडली रवा १-१/२ कप पाण्यात साधारण २ तास भिजवून ठेवावा आणि नंतर जास्तीचे पाणी अलगद काढून टाकावे, त्यात बाकीचे सारे जिन्नस (सोडा सोडून) एकत्र करावे. थोडे थोडे पाणी घालत चमच्याने हलवत भजीच्या मिश्रणासारखे ढोकळा मिश्रण तयार करावे. एकीकडे कुकर मधे पुरेसे पाणी गॅस वर उकळायला ठेवावे. चांगली उकळी फुटल्यावर, मिश्रणात सोडा घालून परत छान फेटावे. भांड्याला थोडे तेल सर्व बाजूने लावून त्यात मिश्रण ओतावे आणि कुकर मधे ठेवावे. कुकर चे भांडे बंद करून शिटी शिवाय २० मिनिटे वाफवून घ्यावे. झाकण उघडून सुरी मध्यभागी घालून बघावी. ढोकळा तयार झाला असल्यास सुरीला काही न चिटकता स्वछ बाहेर येईल. भांडे बाहेर काढावे. ५-१० मिनिटानंतर सुरीने वड्या कापाव्यात. त्यावर तेल, कढी पत्ता, मोहरी, तीळ घालून फोडणी घालावी. कोथिंबीर, बारीक शेव, खीसलेले खोबरे / नारळ घालून सजवावे. मेथी ढोकळा तयार आहे.



सुधीर जोशी  


४ टिप्पण्या:

  1. जोशी साहेब

    रेसिपी मस्त. तोंडाला पाणी सुटले.

    करायला पेशन्स नाही. खायला केव्हा येऊ.

    उत्तर द्याहटवा
  2. अविबाश, प्रतिसादा बद्दल अनेक आभार. खाऊ घालण्यासाठी जोशींचे दार सदैव उघडे असेल. रेसिपी ट्राइ करूनजरूर कळवा.

    उत्तर द्याहटवा
  3. Here comes the Master Chef !!!!!!
    मस्त रेसिपी आहे.
    तुमच्याकडून अजून तुमच्या वेगवेगळ्या पाककृतींची प्रतिक्षा आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. सुरेख वर्णन, सुरेख दर्शन
    पाणी सुटते नुसते बघून
    टेस्ट करावे वाटे पाहून
    नक्की आता बघेल करून

    -मिलिंद देशमुख

    उत्तर द्याहटवा