रविवार, १७ एप्रिल, २०११

मृणालिनी पंडितच्या सॅलड रेसिपीज

मृणालिनी पंडितच्या सॅलडच्या रेसिपीज मुग्धा सरनाईकने आवर्जून टाईप करुन सगळ्यांना उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. जे या प्रात्यक्षिकाला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल.



१. सनशाईन सलाड
साहित्य -
बो पास्ता
फ्रेंच बिन्स
ब्रोकोल्लीचे तुरे
मक्याचे दाणे
बारीक चिरलेली लाल, केशरी, हिरवी, पिवळी सिमला मिरची (choose any ३ colors)
Iceberg lettuce (सलाडसाठी चिरून) 
मनुका (पाण्यात भिजवून काढलेल्या)
ड्रेसिंग - मिरी पावडर, Extra Virgin Olive Oil, लिंबू रस , बेसल पावडर (dry ), मीठ 
कृती - 
१. प्रथम पास्ता एका भांड्यात पाणी आणि एक टेबलस्पून  Olive Oil टाकून उकळवून घेणे. जास्त शिजेपर्यंत उकळू नये. नंतर पास्ता चाळणीवर काढून थंड पाण्याखाली एकदा धरून पुन्हा एक चमचा olive oil शिंपडून मोकळे करावेत. अशाने ते एकमेकांना चिकटत नाहीत
२. फ्रेंच बिन्स थोड्या पाण्यात मीठ टाकून ग्यासवर भांड्यात ३ मिनिटे उकळंवणे  आणि नंतर ड्रेन करून छोट्या चिरणे (तिरप्या चिराव्यात).   
३. ब्रोकोल्लीचे तुरे पाण्यात मीठ टाकून २ मिनिटे ग्यासवर  भांड्यात उकळवून ड्रेन करणे. 
४. मक्याचे दाणे थोड्या पाण्यात मीठ टाकून मायक्रोवेव्ह मध्ये ५-७ मिनिटे उकळवून घेणे.
५. मोठ्या सॅलड बाऊल मध्ये पास्ता, चिरलेल्या फ्रेंच बिन्स, ब्रोकोल्लीचे तुरे, मक्याचे दाणे, चिरलेल्या सिमला मिरच्या, मनुका आणि सर्वात वरती चिरलेला lettuce घालणे.
६. ड्रेसिंग घालून सर्व सलाड toss करणे.   


२. रेनबो सलाड
साहित्य -
मक्याचे दाणे
उकडलेल्या सोया बिन्स
उभी चिरलेली लाल, काळी आणि हिरवी द्राक्षे 
उभी चिरलेली स्ट्रोबेरी
किसलेले गाजर
बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची
Canned अननसच्या चकत्यांचे तुकडे करून  
लाल सफरचंदाचे छोटे तुकडे
मनुका (पाण्यात भिजवून काढलेल्या)
रोस्टेड अक्रोडचे छोटे तुकडे  
ड्रेसिंग - मिरी पावडर, मेयोनीज, मीठ 
कृती -
१. सलाड बाउल मध्ये सर्व साहित्य एकत्र करून ड्रेसिंग घालणे आणि toss करणे. 
२. वरील साहित्यामध्ये मेयोनीज आणि सोया बिन्स न घालता उकडलेले छोले, लिंबू रस आणि olive oil  घालून वेगळे सलाड बनवता येईल.
 

३. कोबीचे सलाड
साहित्य -
बारीक उभा चिरलेला कोबी
लसणीच्या ३ पाकळ्या olive oil मध्ये ठेचून
चिरलेली पार्सले 
टोमाटो चिरून केलेले तुकडे 
शेंगदाणे (Blanched)
रोस्टेड अक्रोडचे छोटे तुकडे
ड्रेसिंग - Olive ओईल, मिरी पावडर, लिंबू रस
कृती -
१. वरील सर्व साहित्य सलाड बाउल मध्ये घालून ड्रेसिंग घालून toss करणे.
२. पार्सले ऐवजी चिरलेली कोथिंबीर घालून वेगळे सलाड बनवता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा