मंगळवार, ११ जानेवारी, २०११

हळदीचे लोणचे


साहित्य :

५०० ग्रॅम आंबे हळद
१०० ग्रॅम साधी हळद
१०० ग्रॅम आलं
१२ लिंबं
१०० ग्रॅम कैरी लोणच्याचा मसाला
मीठ
५ टेबल स्पून तेलाची फोडणी (नेहमीचीच)

कृती :

दोन्ही हळदी व आलं बारीक चिरुन घ्याव्यात. त्याला सगळ्या लिंबाचा रस व मीठ लावून २ तास तसेच ठेवून द्यावे. दोन तासानी त्यात लोणच्याचा मसाला व थंड फोडणी घालून चांगले कालवून ठेवावे. हळदीचे लोणचे तयार. हे लोणचे वर्षभर सुध्दा चांगले राहते.




टीप : थंडीच्या सिझन मध्ये ही हळद मिळते.
(खास कुवेत वासियांसाठी) ही हळद अपल्या (Lulu Hypermarket) मिळू शकते.








वैशाली काजरेकर

३ टिप्पण्या: