मंगळवार, ११ जानेवारी, २०११

सरते वर्ष २०१०




सरते  वर्ष  गेले  काही  सांगून,
एकविसाव्या शतकातील पहिले दशक गेले आता संपून .
त्सुनामीचा  कहर, तर  कुठे  भूकंपाचा  हाहाकार,
पृथ्वीचे  वाढते  तापमान,
हिमालयावरील विरघणारा बर्फ ,
आग, धूळ  ओकणारी  धरती ,
अनाहूत  येणारा  पाऊ
एकविसाव्या  शतकातील  पहिले दशक  गेले  काही  कुजबुजून
तरीही  वेळ   गेली  नाही अजून
उभारूया  सर्व  मिळून  गुढी  नव  संकल्पाची ,
घडावे  पर्यावरण  संतुलनाचेसंरक्षण  कार्य  हातून.

स्वाती कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा